डोंगर शेवली येथे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिन महोत्सव साजरा….

Screenshot_2025-08-27-13-11-22-84_3a637037d35f95c5dbcdcc75e697ce91

चिखली (गजानन दसरकर) डोंगर शेवली तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा येथे दिनांक 25/ 8 /2025 रोजी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिन महोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्यात आला श्रीकृष्ण मंदिर किन्हाळा रोड डोंगर शेवली या ठिकाणाहून चक्रधर स्वामींची पालखी रथ मिरवणूक निघून सदर मिरवणुकीची सुरुवात ग्रामपंचायत कार्यालय पासून सुरू करण्यात आली दुपारी दोन ते पाच वाजेपर्यंत गावातून मिरवणूक निघाली सदर निर्मिती करिता कासारखेड येथी ल भजनी मंडळ , धोडप येथील भजनी मंडळ, जोगेश्वरी भजनी सेवा मंडळ डोंगर शेवली या मंडळांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला प्रथम सकाळी दहा वाजता ग्रामपंचायत कार्यालयामध्ये शासकीय पूजा करण्यात आली

त्यानंतर मराठी पूर्व केंद्रीय शाळेमध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांची शासकीय पूजा करण्यात आली शाळेमध्ये मुख्याध्यापक श्री लोखंडे सर यांनी चक्रधर स्वामी यांच्या जीवनावर प्रकाश टाकला त्याच ठिकाणी गजानन दसरकर यांनी चक्रधर स्वामींचा जन्म तसेच चक्रधर स्वामींनी रामटेक येथे निमित्त करून महाराष्ट्र मध्ये वास्तव्यास कसे आले त्यांनी गोविंद प्रभू पासून चक्रधर हे नाव कसे स्वीकारले आणि चक्रधर स्वामींनी जातीपातीचे बंधने तोडून महिलांना समानतेचा अधिकार दिला अंधश्रद्धा निर्मूलन कशा प्रकारे केले आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी चक्रधर स्वामींचे माहीमभट्ट लिखित लीळाचरित्र ग्रंथ तसेच महादंबेचे ढवळे हा ग्रंथ अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर या ठिकाणी मराठी भाषेतील पहिला ग्रंथ लिहिला गेल्याचे नमूद केले . याच ग्रंथाच्या आधारे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे आणि म्हणून त्याच ठिकाणी शासनाने 500 कोटीचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी मराठी भाषा विद्यापीठ स्थापन झाल्याचे माहिती मराठी शाळेमध्ये सांगून सर्वांना अनमोल अशी माहिती दिली मिरवणुकीचा समारोप श्रीकृष्ण मंदिर या ठिकाणी करण्यात आला त्या ठिकाणी चक्रधर स्वामींच्या मूर्ती उपहार आरती करण्यात आली त्यानंतर परमपूज्य महंत डॉक्टर संवत्सरकर बाबा महानुभाव संचालक श्रीकृष्ण मंदिर चिखली यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले होते प्रवचन संपल्यानंतर मंदिर कमिटीच्या हस्ते बाबांचा सत्कार करण्यात आला गावकऱ्यांच्या वतीने सुद्धा सोमनाथ महाराज संस्थान डोंगर शेवली संस्थांचे अध्यक्ष छगन नाना सावळे यांनी बाबांचा हार घालून शाल श्रीफळ देऊन सत्कार केला तर नंतर बबनरावजी सावळे संचालक मार्केट कमिटी चिखली यांनी सुद्धा बाबांचा यथोचित सत्कार केला सदर कार्यक्रम स्थळी अनेक राजकीय नेत्यांनी भेटी दिल्या

तसेच शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी सुद्धा भेटी दिल्या त्यामध्ये प्रामुख्याने बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार माननीय श्री द्रुपद रावजी सावळे साहेब, माननीय श्री प्रकाश भाऊ डोंगरे युवा सेना जिल्हाध्यक्ष उभाठा गट, माननीय श्री समाधान भाऊ चिंचोले अध्यक्ष बुलढाणा तालुका पत्रकार संघ, डोंगर शेवली येथील आरोग्य विभागाचे सी एच ओ अवचार मॅडम, आरोग्य सेविका बिबे मॅडम तलाठी श्री कोळसे साहेब, ग्रामपंचायत अधिकारी श्री शेळके साहेब यांनी सदर कार्यक्रमास आवर्जून उपस्थिती लावली ग्रामपंचायत कार्यालयासमोर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या मूर्तीची बाबांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली तर नंतर गावातील प्रतिष्ठित मंडळी भगवानरावजी पाटील भाजपा नेते बबनरावजी सावळे जगन्नाथ सावळे, छगनरावजी सावळे अध्यक्ष सोमनाथ महाराज संस्थान, अतुल पाटील, सिद्धेश्वर पाटील, दिगंबराव सावळे, रवी पाटील शाळा समिती अध्यक्ष, शरद जंवजाळ सरपंच, सुनील गायकवाड उपसरपंच, विजय रामदास सावळे शासकीय कंत्राटदार,शिवाजी सावळे भाजपा नेते पांडुरंग सावळे भाजपा नेते, सोमनाथ बाबुराव सावळे पखवाद वादक, डॉक्टर बबनराव सावळे, समाधान रामकृष्ण सावळे पाटील ज्येष्ठ नेते, डॉक्टर विजय सावळे, दिनकरराव सावळे, अशोकराव दांडडे ग्रामपंचायत सदस्य, आदिनाथ जाधव ग्रामपंचायत सदस्य करवंड, देवानंद पाटील उपसरपंच तोरण वाडा, माधव सुरड कर रेशन दुकानदार श्रीकृष्ण नगर, मान्यवरांनी आवर्जून उपस्थिती लावली तसेच सदर कार्यक्रमास चिखली येथील प्रतिष्ठित सोन्याचे व्यापारी प्रकाश भाऊ दिघे कर यांनी सुद्धा उपस्थिती दर्शवून सदर मंदिरास योग्य ते देणगी देण्याची इच्छा व्यक्त केली तसेच कार्यक्रम स्थळी सर्व गावकऱ्यांच्या साक्षीने प्रकाश भाऊ डोंगरे युवा सेना जिल्हाध्यक्ष यांनी एक लाखापर्यंत श्रीकृष्णाची मूर्ती मंदिरात सप्रेम भेट देण्याची जाहीर केले त्यामुळे दोन्ही मान्यवरांचा संवत्सर कर बाबांचे हस्ते सत्कार करण्यात आला याच ठिकाणी डोंगरशेवली तील शाळा समितीचे अध्यक्ष रवी पाटील यांनी पंचवीस हजार रुपये मंदिरास देणगी म्हणून देण्याचे जाहीर केले सदर कार्यक्रमास पंचक्रोशीतील अनेक मान्यवर मंडळींनी भेटी देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यामध्ये धोडप डोंगर शेवली येथील माजी पोलीस पाटील नारायणराव कोल्हे पाटील,मा गणेश राव पाटील राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष शरद पवार गट, रमेशराव कोल्हे माजी सरपंच धोडप, माननीय प्रकाश सावळे तंटामुक्ती अध्यक्ष अशोकराव कोल्हे माजी सरपंच धोडप, रमाकांत महाले माननीय आमदार सौ श्वेता ताई महाले यांचे चुलत सासरे यांनी सुद्धा कार्यक्रमास उपस्थित राहून सदर मंदिरात बांधकामासाठी देणगी देण्याचे आश्वासन दिले सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिन साजरा करण्याचे डोंगर शेवली वाशी यांचे दुसरे वर्ष असून यावर्षी मात्र भव्य दिव्य असा सोहळा गावकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे पार पाडला या ठिकाणी सर्व गावकऱ्यांसाठी भंडारा आयोजित करण्यात आला होता चार क्विंटलचा स्वयंपाक जवळजवळ पंधराशे भाविकांनि महाप्रसाद चा लाभ घेतला तसेच श्रीकृष्ण संस्थांच्यान वतीने पुढील वर्षी याहीपेक्षा मोठ्या भंडाऱ्याचे आयोजन करू अशी इच्छा व्यक्त केली सदर कार्यक्रमास गावकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला असाच प्रतिसाद पुढील वर्षी पंचक्रोशीतील सर्व गावकऱ्यांनी द्यावा अशी इच्छा व्यक्त मंदिर संस्थांनचे अध्यक्ष गजानन दसरकर यांनी केली सदर कार्यक्रमात पार पाडण्यासाठी मंदिराचेe सचिव रमेश संतोषराव सावळे,मंदिराचे उपाध्यक्ष गोविंद पंडितकर,पुंडलिकराव सावळे मधुकरराव सावळे, रामेश्वर मांडवे,बंटी दादा सावळे, नितीन जावळे या सर्वांनी तीन दिवस अहोरात्र मेहनत घेतली तसेच समस्त गावकरी मंडळींनी मोलाचे सहकार्य केले त्याबद्दल डोंगर शेवली गावकरी मंडळीची आभार श्रीकृष्ण मंदिर कमिटी मार्फत मानण्यात आले

You may have missed

error: Content is protected !!