शिवनी टाका येथील वर्ग २ ची शेतजमीन कशाच्या आधारावर वर्ग १ मध्ये रुपांतरीत केली आहे संबंधित तलाठी संजय चव्हाण यांना तत्काळ बडतर्फ करण्यात यावे – शिवादादा पुरंदरे (जिल्हाध्यक्ष मनसे)
सिंदखेडराजा (अनिल दराडे )
तालुक्यातील शिवनी टाका येथील वर्ग ०२ ची शेतजमीन भगवान बाबुराव दाभाडे यांची असुन ती सुनिता शेषराव कोरडे गट क्रमांक 163 यांना कशाच्या आधारावर विकली तसेच संबंधित तलाठी चव्हाण यांनी आर्थिक देवाण-घेवाण करुन वर्ग ०२ ची शेतजमीन कोरडे यांच्या नावावर केल्याने मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करुन शासनाची फसवणूक केली आहे. त्यामुळे सदर फेरफार रद्द करण्यात यावा आणि तलाठी संजय चव्हाण यांनी सिंदखेडराजा तालुक्यातील निमखेड बुटा येथील अवैधरीत्या फेरफार घेण्यात आला आहे तरी सदर ठिकाणी वरील फेरफार तात्काळ रद्द करण्यात यावा यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने केली असुन सदर मागण्या मान्य न झाल्यास मनसेने तिव्र स्वरुपात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
