पो.अ.श्री. निलेश तांबे यांचे नेतृत्वात, जिल्ह्यात श्री. गणेश उत्सवासाठी तगडा बंदोबस्त तैनात,पोलीस अधि.-200, अंमलदार-2500, होमगार्ड-1300, दंगा काबू पथक-07, शीघ्र कृती दल-01 तर SRPF प्लाटून-04
बुलढाणा ( बुलढाणा माझा न्युज) सर्वत्र गणरायाच आगमन झालं आहे. त्यामुळे जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष एस पी साहेब यांनी
दि.27/08/2025 पासून दि.08/09/2025 या कालावधीत संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात श्री. गणेश उत्सव अत्यंत भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात येत आहे. या काळात जिल्ह्यात अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या करीता मा. पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे यांचे नेतृत्वात संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात तगडा बंदोबस्त लावण्यात आलेला असून यामध्ये पोलीस अधिकारी-200, पोलीस अंमलदार 2500, गृहरक्षक दलाचे होमगार्ड- 1300, राज्य राखीव पोलीस दलाचे (SRPF) चे 04 प्लाटून, दंगा काबू पथक-07, शीघ्र कृती दल-01 बंदोबस्तावर तैनात करण्यात आले आहेत.
प्रतिबंधात्मक कारवाई :-
श्री. गणेशोत्सव निर्वाघ्न पार पडावा, शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, या करीता भारतीय नागरीक सुरक्षा संहिता (BNSS) चे कलम 126, कलम 127, कलम 129 अंतर्गत एकूण 1069 ईसमांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली. तर भारतीय नागरीक सुरक्षा संहिता (BNSS) चे कलम 163(2) प्रमाणे एकूण-1435 ईसमांवर हद्दपारीची कारवाई करण्यात येत आहे.
समाज माध्यमांसाठी आवाहन :-
सोशल मिडीयावर समाज कंटकांनी प्रसारीत केलेल्या खोट्या, दिशाभूल करणाऱ्या अफवांना नागरीकांनी बळी पडू नये तसेच अशा विघातक पोस्ट समाज माध्यमांवर प्रसारीत (व्हायरल) करु नये. समाज माध्यमांवर आलेल्या माहितीची पोलीस किंवा संबंधीत प्राधिकरणा कडून सत्यता पडताळून खात्री करावी.
मंडळांना भेटी दरम्यान घ्यावयाची काळजी :-
श्री. गणेश उत्सवांमध्ये विवीध मंडळांनी तयार केलेले देखाव्यांना भेटी देतांना, होणाऱ्या गर्दी दरम्यान लहान मुले, मौल्यवान वस्तु, मोबाईल फोन ई. व्यवस्थीत सांभाळावे. श्री. गणेश मंडळांना भेटी देतांना आपल्या वाहनापासून रहदारीस अडथळा होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. बंदोबस्तावरील पोलिसांनी दिलेल्या सुचनांचे पालन करावे. या ठिकाणी काही संशयास्पद हालचाल किंवा व्यक्ती असल्यास या बाबतची बाबतची माहिती पोलीस विभागाचा टोल फ्री क्रमांक- 112 यावर द्यावी,
श्री. गणेश राज्य उत्सव :-
महाराष्ट्र शासनाने यावर्षी श्री. गणेश उत्सव हा राज्य उत्सव म्हणून साजरा करण्याचे घोषीत केले आहे. त्यामुळे राज्यातील गणेश उत्सव हा राज्य उत्सव होणे करीता जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळांनी त्यांना दिलेल्या परवानगी मधील नियमांचे काटेकारपणे पालन करावे. शासनाने निर्दीष्ट केलेली ध्वनीच्या मर्यादा सांभाळावी. मंडळा समोर, मिरवणूकी दरम्यान लेझर लाईटचा उपयोग करु नये, रसायन मिश्रीत गुलालाचा उपयोग न करता फुलांचा वापर करावा. देखाव्याकरीता जास्तीची गर्दी होणार नाही याचे नियोजन करावे.
दि.27/08/2025 पासून दि.08/09/2025 या कालावधीत संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात सहर्ष साजरा होत असलेला श्री. गणेश उत्सव हा यावर्षी आनंदोस्तव म्हणून अत्यंत शांततेच्या मार्गाने साजरा करावा, असे आवाहन मा.श्री. निलेश तांबे पोलीस अधीक्षक बुलढाणा यांनी केले आहे.
