भा बौद्ध माहसभेचे मा जिल्हा अध्यक्ष अनंता मिसाळ यांना राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार जाहिर.

IMG-20250826-WA0019

बुलढाणा (बुलढाणा माझा न्युज)भाऊ फाऊडेंशन महाराष्ट्र व शतोकान कराटे व क्रीडा मंडळ जालना यांचेकडून दिला जाणारा यंदाचा २०२५ चा राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते अनंता मिसाळ यांना जाहीर झाला असून ते पत्र २५/०८/ २०२५ रोजी त्यांना प्राप्त झाले आहे. अनंता मिसाळ हे बुलढाणा जिल्ह्यातील भादोला गावचे मूळ रहिवासी असून गेले अनेक वर्ष ते सामाजिक कार्य करत आहेत. सामाजिक बांधिलकी जपत सर्वच वंचित घटकांचा विकास झाला पाहिजे ही भावना मनी ठेवून हे आपले कार्य सतत करत असतात. समाजाभिमुख कार्य करत साहीत्य लेखन या बरोबरच अन्याय अत्याचार विरोधात आंदोलन करने,पाणी टंचाई समस्या रक्तदान, आणि सर्व समाजाच्या सुखा दु:खात हरी-हरी ने भाग घेवून कुठलाही स्वार्थ न ठेवता सहकार्य करत असतात,काव्य रचना करून प्रबोधन करत असतात,त्यांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र तील अनेक सामाजिक संस्थांनी सन्मानित केले आहे. जालना येथील संस्थेने यंदाचा राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार जाहीर केला आहे त्यांना ३१ऑगस्टला नगरपरिषद मंगल कार्यालय भोकरदन येथे सन्मानित केले जाणार आहे .

You may have missed

error: Content is protected !!