विद्युत लाईनचा शॉट लागल्याने महिलेचा मुत्यू

Screenshot_2025-08-28-19-17-08-83_3a637037d35f95c5dbcdcc75e697ce91

सिंदखेडराजा (अनिल दराडे )सिंदखेडराजा तालुक्यातील जऊळका येथील महिला व तिचा पती आज दि 28 ऑगस्ट रोजी शेतात सोयाबीन निंदण्यासाठी गेले असता सोयाबीन निंदत असतांनाच शेतातील लाईच्या टोलच्या तानाला करंट होता त्याला तिच्या हाताचा स्पर्श झाल्याने तिचा दुपारी 4 वाजता जागीच मृत्यू झाला
याबाबत सविस्तर असे की, तालुक्यातील जऊळका येथील मंगलबाई रंगनाथ सांगळे वय 57 वर्षे व पती रंगनाथ सांगळे हे दोघे पती पत्नी आज सकाळी दहा वाजता शेतात सोयाबीन निंदण्यासाठी शेतात गेले होते त्या सोयाबीनच्या शेतात लाईनचा खंबा होता त्या खंब्याच्या तानाला करंट होता सदर महीला ही त्या तानाजवळील सोयाबीन निंदत असतांना तिच्या हाताचा त्याचा स्पर्श झाला असता कालच चांगला पाऊस पडलेला असल्याने शेतातील जमीन ओली त्यामुळे तिला जबर शॉट लागून तीचा हात त्या तानाला चिटकल्याने तिचा जागीच मुत्यू झाला वुत्त लिहीपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता

You may have missed

error: Content is protected !!