ग्राहक (उपभोक्ता ) संरक्षण समितीच्या मिडीया विभाग प्रमुख बुलढाणा जिल्हापदि अंकुश थुटटे पाटिल यांची नियुक्ती
चिखली (एकनाथ माळेकर)भारत सरकार नोंदणीकृत माणुसकी सोशल व ग्राहक संरक्षण फॉउंडेशन संचालित ग्राहक (उपभोक्ता ) संरक्षण समितीच्यामिडीया विभाग प्रमुख बुलढाणा जिल्हापदि अंकुश थुटटे पाटिल यांची नियुक्ती यांची नियुक्ती करण्यात आली.सदर नियुक्ती ही ग्राहक (उपभोक्ता ) संरक्षण समितीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष दादाभाऊ केदारे,नाशिक यांनी एका पत्रा द्वारे केली आहे. ग्राहक (उपभोक्ता )संरक्षण समिती, डॉ. शालिग्राम चव्हाण अध्यक्ष बुलढाणा जिल्हा ग्राहक (उपभोक्ता )संरक्षण समिती यांच्या शिफारशीने निवड करण्यात आली आहे.याबाबत सविस्तर असे की, ग्राहक (उपभोक्ता )संरक्षण समितीचा उद्देश केंद्र सरकार आणि राज्यसरकार ला मदत करणे व सहकार्य करणे हा आहे.नवनियुक्त बुलढाणा जिल्हा मिडीया विभाग प्रमुख बुलढाणा जिल्हा समाज कार्यात अग्रेसर असून समाज कार्याची त्यांना आवड आहे.तसेच त्यांनी पत्रकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले आहे. . शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, विध्यार्थी यांना आता पर्यंत शासनाच्या योजनाची सविस्तर माहिती व लाभ मिळून देण्यासाठी त्यांनी आतापर्यंत शर्तीचे प्रयत्न करून न्याय मिळून दिला आहे.त्यामुळे जिल्ह्यात त्यांचा दांडगा संपर्क असून त्याचा फायदा नक्कीच समितीला होईल.ग्राहक चळवळीसाठी,जनजागृतीसाठी व उपभोक्ता संरक्षण समितीच्या हितासाठी मी नेहमीच कटिबद्ध राहील असे त्यांनी यावेळी सांगितले.मला दिलेल्या बुलढाणा मिडीया विभाग प्रमुख बुलढाणा जिल्हा पदाची जबाबदारी व माझ्यावर उपभोक्ता संरक्षण समितीचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष आदरणीय दादाभाऊ केदारे साहेब यांनी टाकलेला विश्वास अत्यंत चांगल्या प्रकारे पार पाडील अशी गाव्ही त्यांनी यावेळी दिली.वरिष्ठ पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्ह्यातील सर्व या अगोदरचे पदाधिकारी व नवनियुक्त पदाधिकारी यांना सोबत घेऊन मनापासून काम करेल व यासाठी सर्वांनी मला सहकार्य करावे असे आव्हान देखील त्यांनी केले.त्यांच्या नियुक्तीमुळे सर्व स्तरावतुन त्यांच्यावर कौतुकाचा व अभिनंदनचा वर्षाव होत आहे.त्यांनी यावेळी वरिष्ठ सर्व पदाधिकारी यांचे विशेष आभार मानले.
