डोणगाव ग्रामपंचायतीकडे सिमेंट रस्ता करण्याची मागणी
डोणगाव( बुलढाणा माझा न्युज)
डोणगाव गावातील रहेमत नगर परिसरातील मज्जिदपासून शेख सादिक यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता करून द्यावा अशी मागणी रहेमतिया सोशल ग्रुप डोणगाव यांच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, रहेमत नगर परिसरातील रस्त्याची अवस्था अत्यंत जीर्ण झाली असून पावसाळ्यात पाणी साचून चिखल तयार होतो. त्यामुळे शालेय विद्यार्थी, महिला व वयोवृद्ध यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. रस्त्यामुळे सुरक्षित व सोयीस्कर वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे. तसेच या रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना दैनंदिन जीवनात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.
या रस्त्यावर धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांसाठी लोकांची मोठ्या प्रमाणावर ये-जा होत असल्याने रस्ता दुरुस्त करून सिमेंट रस्ता करण्याची तातडीची आवश्यकता आहे, असेही नमूद करण्यात आले आहे.यावेळी रहेमतिया सोशल ग्रुपच्या वतीने रहेमतिया सोशल ग्रुप चे अध्यक्ष ज़ैनुल आबेद्दीन शेख उस्मान कुरेशी आवेज खान पठाण शेख असलम कुरेशी सय्यद हरून तोफीक बागवान शेख हनजला अहेमद खान सय्यद सादिक सय्यद उस्मान आसिफ बागवान शेख अबरार इरफान बागवान इब्राहिम बागवान शेख सादिक यांच्यासह आदीनी यांनी सह्या करून हे निवेदन ग्रामपंचायतीकडे सादर केले.
ग्रामपंचायतीने तातडीने लक्ष घालून सिमेंट रस्ता तयार करून द्यावा, अशी मागणी रहेमतिया सोशल ग्रुपने केली आहे.
