शिव मावळा गणेश मंडळ मेरा बु मंडळासमोर जनजागृती कार्यक्रम संपन्न

IMG-20250830-WA0001

चिखली (एकनाथ माळेकर) चिखली तालुक्यातील मौजे मेरा बु येथील शिव मावळा गणेश मंडळ मेरा बु यांच्या वतीने जय मल्हार वाघे भजनी मंडळ मेरा बु यांचा जनजागृती कार्यक्रम रात्री आठ वाजता मोठ्या थाटामाटात शिव मावळा गणेश मंडळ मेरा बु येथे संपन्न झाला यावेळी समाजामध्ये अनिष्ट प्रथा रुडी यांच्या विषयी वाघमंडळाचे कार्यकर्ते यांनी गायनातून आणि नाट्यमंडळातून जन जागृती केली तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षक खास संभाजीनगर येथून आलेले जनजागृती मंडळाचे सदस्य हे खास आकर्षण होते त्यांनी आपल्या कार्यक्रमातून जनजागृती केली आहे तर जय मल्हार वाघे मंडळाचे सदस्य रामदास पंखुले संजय गायकवाड नामदेव काळे गजानन दातार शेषराव तांगडे तेजराव गावडे विजय गाढवे अरुण पंडित पवन तोडे संजय पडघान समाधान दातार यांनी समाज प्रबोधनाचे खूप मोठ्या प्रमाणात मार्गदर्शन केले आहे सदर कार्यक्रमाचे आयोजन शिव मावळा गणेश मंडळ बाजार गल्ली मेरा बु यांनी केले आयोजन केले होते या कार्यक्रमाचा सर्व पंचक्रोशीतील मंडळींनी लाभ घेतला आहे

You may have missed

error: Content is protected !!