नगरपरिषद ने पूर्वी राबवलेल्या `गणराया पुरस्कार योजनेला पारंपारिक स्वरूप देऊन सुरु ठेवावी, शेतकरी मित्र दिलीप चौधरी मातृतीर्थ सिंदखेड राजा.यांची मागणी…

IMG-20250830-WA0009

सिंदखेडराजा (अनिल दराडे ) मातृतीर्थ सिंदखेड राजा ऐतिहासिक व सुसंस्कृत नगरी आहे, आणि लोकमान्य टिळकांनी 1893 मध्ये ब्रिटिशांच्या विरोधात लोकांनी संघटित व्हावे म्हणून गणेश उत्सवाला सुरुवात केली, तेव्हापासून सिंदखेडराजांमध्ये पारंपरिक पद्धतीने गणेश उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा होतो,अनेक वर्षापासून नगरपरिषद ने सामाजिक सुसंस्कृत व समाज जागृत देखावे निर्माण करणाऱ्या गणेश मंडळांना गणराया पुरस्कार देत आली आहे,
यावर्षी सुद्धा नगर परिषद गणराया पुरस्कार योजना सुरू ठेवावी, या संदर्भात आज सकाळी शेतकरी मित्र दिलीप चौधरी यांच्या उपस्थिती गणपती मंडळांच्या अध्यक्ष सोबत मीटिंग घेण्यात आली व या मीटिंगमध्ये चालू वर्षी नगरपरिषद 21000, 31000, व 51000, अशाप्रकारे तीन बक्षीस सामाजिक, शैक्षणिक, ऐतिहासिक व समाज जागृत उत्कृष्ट देखावे निर्माण करणाऱ्या गणेश मंडळांना देण्यात यावे,
यासाठी सर्व गणेश मंडळाच्या माध्यमातून नगर परिषदला निवेदन देऊन वरील प्रमाणे गणराया पुरस्कार द्यावा अशी सर्व गणपती मंडळांची इच्छा आहे

You may have missed

error: Content is protected !!