दुसरबीड येथे शिव व्याख्यान सोहळा चे आयोजन डि जे राजे

IMG-20250830-WA0011

सिंदखेड राजा (अनिल दराडे)शिव छत्रपती गणेश मित्र मंडळ दुसरबीड यांच्या वतीने भव्य सत्कार समारंभ व शिव व्याख्यान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमात व्याख्याते म्हणून मा. जिजाऊ यांचे १३ वे वंशज श्री. ज्ञानेश गणेशराव राजे जाधव मार्गदर्शन करणार असून ते “शिवरायांची स्वराज्य नीती” या विषयावर आपले विचार मांडणार आहेत.

कार्यक्रम दिनांक ३१ ऑगस्ट २०२५ रोजी रविवार, सायंकाळी ७ वाजता पार पडणार आहे.

कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मा. आमदार मनोज भाऊ कायंदे (मातृतीर्थ सिंदखेड राजा विधानसभा), मा. आमदार सिद्धार्थ भाऊ खरात (मेहकर विधानसभा), तसेच मा. मा. आमदार राजेंद्रजी शिंगणे व शशिकांत खेडेकर उपस्थित राहणार आहेत. याशिवाय श्री. संजय मातोंडकर साहेब (पोलीस स्टेशन, किनगाव राजा) यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या सोहळ्याचे आयोजन शिव छत्रपती गणेश मित्र मंडळ दुसरबीड यांनी केले असून, गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक मंडळातर्फे करण्यात आले आहे.

You may have missed

error: Content is protected !!