सेवापूर्ती गुणगौरव सोहळा तथा सत्कार सोहळा कार्यक्रम संपन्न….मुख्याध्यापक श्री गिरीश वाघमारे ३५ वर्ष ज्ञानदानाच्या कार्यातून सेवानिवृत्ती……

IMG-20250830-WA0016

चिखली (निलेश कोल्हे )पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या धोडप जिल्हा परिषद मराठी उच्च माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री गिरीश श्रीराम वाघमारे यांचे वयोमानानुसार सेवा निवृत्त झाले आहे. यांचा सेवापुर्ती सत्कार सोहळा दिनांक ३० ऑगस्ट २०२५ वार शनिवार रोजी धोडप येथे जिल्हा परिषद मराठी उच्च माध्यमिक शाळा येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. त्यांच्या सेवानिवृत्ती सत्कार सोहळा येथे मोठ्या उत्साहात पार पडला त्यांच्या प्रदीर्घ सेवा काळातील ज्ञानदानाच्या कार्याबद्दल त्यांचा गुणगौरव करण्यात आला.

मुख्याध्यापक गिरीश वाघमारे यांनी ३५ वर्ष ज्ञानदानाचे काम केले २००५ मध्ये त्यांनी जिल्हा परिषद शाळा धोडप येथे रुजू झाले धोडप येथे त्यांनी २० वर्ष ज्ञानदानाचे व चांगले मार्गदर्शन करण्याचे काम केले व आज धोडप येथून सेवानिवृत्त झाले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राम प्रताप कोल्हे शाळा व्यवस्थापन समिती धोडप हे होते. प्रमुख अतिथी मा. इंगळे साहेब व मा. केवट साहेब शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती चिखली व मा. ए. एन.अनाळकर केंद्रप्रमुख डोंगर शेवली हे होते व्यासपीठावर प्रमुख मान्यवर शेतकरी नेते रविकांत तुपकर,संतोष काळे भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष चिखली,अरुण शिरसाट माजी सरपंच सुंदरखेड, प्रदीप कोल्हे सरपंच धोडप ,नारायण पाटील सामाजिक कार्यकर्ते ,रमेश कोल्हे माजी सरपंच, रघुनाथ कोल्हे माजी ग्रामपंचायत सदस्य ,बबनराव कोल्हे माजी ग्रामपंचायत सदस्य , धोडप येथे कार्यरत अमोल पांढरे ग्राम महसूल अधिकारी,जीवन उगले भाजपा युवा मोर्चा चिखली तालुका उपाध्यक्ष, आसिफ भाई कलाल सामाजिक कार्यकर्ते डोंगर खंडाळा ,

यांची उपस्थिती होती सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माॅंसाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले मुख्याध्यापक गिरीश वाघमारे व त्यांच्या पत्नी सौ मीरा वाघमारे यांचा यथोचित सत्कार करून गुणगौरव करून त्यांना भेटवस्तू ,महापुरुषांच्या प्रतिमा ,पुष्पगुच्छ ,शाल श्रीफळ देण्यात आले. यावेळी डोंगर शेवली व शेलसुर केंद्रातील अंतर्गत शाळेतील मुख्याध्यापक,शिक्षक यांच्याकडून सत्कार करण्यात आला‌.

तसेच धोडप येथील ग्रामस्थांनी शाल श्रीफळ,पुष्पगुच्छ व छत्रपती श्री शिवाजी महाराज व तुळजाभवानी यांची प्रतिमा भेट देऊन नागरी सत्कार करण्यात आला यावेळी मान्यवर व्यक्तींनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच धोडप येथील गावकऱ्यांच्या वतीने मनोगत प्रवीण सुभाष कोल्हे माजी उपसरपंच यांनी केले. तर सूत्रसंचालन सावळे सर तर आभार प्रदर्शन लोखंडे सर यांनी व्यक्त केले. सत्कार सोहळा कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे नियोजन शेख सर व धामणे सर यांनी पाहिले. कार्यक्रमासाठी गावातील नागरिक व डोंगरशेवली, शेलसुर केंद्रातील अंतर्गत शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक, माजी शिक्षक वृंद व आप्तेष्ट यांची प्रमुख उपस्थिती होती.

You may have missed

error: Content is protected !!