IMG-20250830-WA0046

सिंदखेडराजा (अनिल दराडे)
सिंदखेड राजा तालुक्यातील ग्रामपंचायत उमरद येथे 29 ऑगस्टला ग्रामसभा, देवीच्या मंदिरासमोरील सभामंडपामध्ये सरपंच निर्मला पंढरीनाथ उबाळे, यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, कोरम पूर्ण झाल्यानंतर सभेला सुरुवात करण्यात आली, यावेळी ग्रामपंचायत अधिकारी विनोद सातपुते, यांनी सर्व ग्रामस्थांचे स्वागत करून विषय सूचीनुसार विषयाचे वाचन केले, व प्रत्येक विषयावर साधक बाधक चर्चा करण्यात आली
, यावेळी महसूल विभागाच्या योजना याबाबत महसूल अधिकारी श्रीमंत पांडव यांनी सविस्तर माहिती समजावून सांगितले, त्यानंतर शिक्षण विभाग, महिला व बालकल्याण विभाग, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना, चे लेबर बजेट तयार करणे, पांदण रस्ते घेणेबाबत, जन्म मृत्यू विवाह, यांच्या नोंदी करण्यामध्ये झालेले नवीन बदल समजावून सांगण्यात आले, प्लास्टिक बंदी, नारीशक्ती ग्रामस्थ समिती, ग्राम विकासाच्या विविध योजना राबविणे, घर कर पाणी कर बसून करणे, त्याचप्रमाणे महात्मा गांधी तंटामुक्त समिती स्थापन करण्यात आली, यावेळी सेवानिवृत्त सैनिक पांडुरंग डोईफोडे, यांची तंटामुक्त समितीचे अध्यक्ष म्हणून, तर गणेश बोडखे, यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली, यावेळी अनेक विषयावर साधक बाधक चर्चा करण्यात आली, तसेच युवकांनी अनेक अडचणी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यासमोर मांडल्या, त्याचप्रमाणे गावांमध्ये असलेले घाणीचे साम्राज्य, किनगाव राजा ते उमरद रोडवर, असलेली घाण, रोडवर बांधण्यात येणारे जनावर, रोडवर उभ्या करण्यात आलेले वाहन, त्याचप्रमाणे रोडवर असलेली घाण, याबद्दल अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली, त्याचप्रमाणे नळाचे पाणी नियमित येत नसल्यामुळे, अनेकांनी नाराजी व्यक्त केली, यावेळी सभेला उपसरपंच रूपाली देशमुख, आनंदीबाई शिनगारे, विठ्ठल भांबर्गे, संतोष गिरी, गोविंदराव मुळे, दत्तू सानप, पंढरी उबाळे, प्रभाकर देशमुख, राजू शिनगारे,, तलाठी पांडव, मुख्याध्यापक दराडे, लाईनमन संदीप डोईफोडे, वनरक्षक वाडेकर मॅडम, अंगणवाडी सेविका इंगळे, मुंढे, यांच्यासह अनेक गावकरी हजर होते, सर्वात शेवटी सर्व गावकऱ्यांनी साधक-बाधक चर्चा करून, खेळीमेळीच्या वातावरणात ग्रामसभा पार पडली, याबद्दल संतोष गिरी यांनी सर्वांचे आभार मानले

You may have missed

error: Content is protected !!