मराठा आरक्षण आंदोलनाला रहेमतिया सोशल ग्रुपचा हातभार…
डोणगाव (बुलढाणा माझा न्युज)मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे सध्या मुंबईतील आझाद मैदान येथे आरक्षणाच्या मागणीसाठी ठामपणे आंदोलन सुरू ठेवून आहेत. परंतु, या ठिकाणी आंदोलनकर्त्यांवर अन्यायकारक पद्धतीने अडचणी निर्माण केल्या जात आहेत. शासनाने तेथील हॉटेल्स व जेवणाची व्यवस्था बंद करून आंदोलनकर्त्यांना अडचणीत आणले.
अशा परिस्थितीत “आपला मराठा बांधव उपाशी राहू नये” या भावनेतून डोणगाव येथील काही मराठा बांधवांनी मदतीचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत रहेमतिया सोशल ग्रुप तर्फे मदतीचा हात पुढे करण्यात आला.संस्थेच्या वतीने “फुल नाही पण फुलाची पाकळी” या भावनेतून 30 किलो गव्हाचे पीठ देण्यात आले आंदोलनातील आयोजक मंडळींनी हा उपक्रम मोठ्या मनाने स्वीकारला तसेच रहेमतिया सोशल ग्रुपचे आभार मानले.या उपक्रमामागे रहेमतिया सोशल ग्रुपचे अध्यक्ष जैनुल आबेद्दीन शेख यांचे मार्गदर्शन लाभले तर आवेश खान पठाण, उस्मान कुरेशी, मोहम्मद शोएब आदी कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला.गावातील नागरिकांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले असून “धर्म-जात न पाहता संकटाच्या वेळी समाजासाठी एकत्र उभे राहणे हीच खरी माणुसकी आहे” असे मत व्यक्त केले.
