अंढेरा ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्या आवाहनाला युवकांचा प्रतिसाद५० परिक्षार्थीनी दिली पोलिस भरती लेखी सराव परिक्षा.

IMG-20250901-WA0009


दे राजा( एकनाथ माळेकर) जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी गणेश उत्सव काळात नवनवीन संकल्पना रुजवत अनेक महत्त्वपूर्ण संकल्पना अंमलात आणलेल्या असताना अंढेरासह परिसरातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे तसेच आगामी होऊ घातलेली पोलिस भरतीची तयारी करणारे मुले आणि मुली यांची आॕपरेशन परिवर्तन अंतर्गत ठाणेदार रुपेश शक्करगे यांनी दि.३१आॕगस्ट २०२५ रोजी अंढेरा पोलिस स्टेशनच्या प्रांगणात सकाळी साडे दहा ते बारा दरम्यान स्पर्धा परीक्षा तसेच पोलिस भरती लेखी सराव परीक्षेचे भव्य आयोजन करण्यात आले होते.
अंढेरा ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्या आवाहनाला परिसरातील स्पर्धा परीक्षा तसेच पोलिस भरतीची तयारी करणारे मुले आणि मुलीनी उत्तम प्रकारे प्रतिसाद देत तब्बल ५० परिक्षार्थीनी हजेरी लावली.लेखी परिक्षेचे सर्व नियम पाळत मुलां – मुलींनी परिक्षा दिली.यावेळी सर्वाचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले होते.आप-आपसात कोणी बोलणार नाही म्हणून तगडा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.


संत भगवान बाबा गणेश मित्र मंडळांचे सहकार्य लाभले.

गावातील संत भगवान बाबा गणेश मित्र मंडळांचे पदाधिकारी यामध्ये समाधान नागरे,सचिन सानप,अमोल सानप,विकास कायंदे,विशाल वाघ,विलास मानवतकर यांचे लेखी सराव परीक्षेदरम्यान मौलाचे सहकार्य लाभले.झालेल्या लेखी सराव परीक्षेत पहिल्या तीन उमेदवारांना ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्या वतीने योग्य बक्षीस देण्यात येणार आहे.

You may have missed

error: Content is protected !!