दुसरबिड येथे पोलिसांचे पथसंचलन व मॉब डिस्पोझल प्रॅक्टिस
सिंदखेडराजा(अनिल दराडे ) दिनांक २ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ५.०० ते ५.३० या वेळेत दुसरबिड येथे पोलिसांच्या वतीने पथसंचलन तसेच मॉब डिस्पोझल प्रॅक्टिसचे आयोजन करण्यात आले.

आगामी गणेशोत्सव तसेच शहरातील मुलाखतीच्या पार्श्वभूमीवर मा. पोलिस अधीक्षक बुलडाणा यांच्या आदेशाने आणि मा. अपर पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रॅक्टिस घेण्यात आली. उपविभागीय पोलिस अधिकारी सौ. मनीषा कदम तसेच किनगाव राजा पोलिस ठाण्याचे ठाणेदार मारतोडकर यांच्या उपस्थितीत हे पथसंचलन पार पडले.
या वेळी दुसरबिड येथील प्रमुख मार्ग तसेच मिश्र वस्ती भागातून पथसंचलन काढण्यात आले. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांकडून मॉब डिस्पोझल प्रॅक्टिस घेण्यात आली. या उपक्रमात स्थानिक पोलिस कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
