मखरामध्ये निघाला अतिशय विषारी मण्यार साप..

IMG-20250903-WA0003

लोणार (यासीन शेख)दि 2/9/2025 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास पिंपळनेर येथील रहिवासी अश्विन सानप यांच्या घरी गौरी गणपतीच्या मखरमध्ये साप आढळला असता त्यांनी तत्काळ ‘मी लोणारकर’ टीम सदस्य सर्पमित्र सचिन कापुरे व सर्पमित्र कमलेश आगरकर याना कळविले.


माहिती मिळताच लगेच ते या ठिकाणी पोचले प्रथम साप कोणता आहे याची पाहणी केली असता निदर्शनास आले की हा अत्यंत विषारी असा मण्यार प्रजातीचा साप असल्याचे कळाले. घरात पाहुण्यांची रेलचेल सणाचा उत्साह या गर्दीतून हा साप व्यवस्थित रेस्क्यू करायचे होते.घरात राहणाऱ्यांना कुणाला दंश तर केली नाही ना यांची विचारणा केली कारण याचे दात अतिशय छोटे असतात. पण आनंदाची बातमी की ही हानी नक्कीच टळली. सर्पमित्र विनय कुलकर्णी यांनी या परिवाराला असे झाल्यास घ्यायची काळजी सांगितली. सचिन कापुरे व कमलेश यांनी या सापाला पकडून त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडले व त्याला ही जीवदान दिले .
मण्यार हा भारतातील चार प्रमुख विषारी सापांपैकी एक आहे, याचा रंग पोलादी निळा असून अंगावर पांढरे पट्टे किंवा खवले असतात. हा साप अतिशय विषारी असून रात्रीच्या वेळी जास्त सक्रिय असतो आणि जंगलात राहणे पसंत करतो. दिवसा हा साप आढल्याने सर्पमित्र कुतूहल व्यक्त करत आहेत.या प्रसंगी पिंपळनेर येथील महिला, मुले आणि मोठ्या संख्येने गावकरी जमले होते

You may have missed

error: Content is protected !!