अखेर आडगाव राजा येथील खड्डे बुजविण्यास सुरवातरामदास कहाळे यांच्या उपोषणाची सांगताआमदार मनोज कायंदे यांचे तत्परता
सिंदखेड राजा( अनिल दराडे)सिंदखेड राजा तालुक्यातील आडगाव राजा ते सावखेड तेजन दरम्यान रस्त्यावरील जीवे घेणेखड्डे बुजविण्यासाठी रामदास कहाळे यांनी दिनांक 2 सप्टेंबर रोजी सुरू केलेल्या उपोषणाची आमदार मनोज कायंदे यांनी दखल घेत कार्यकारी अभियंता यांना तात्काळ सदर खड्डे बुजविण्या संदर्भात आदेश दिल्याने आज दिनाक 3 सप्टेंबर रोजी कार्यकारी अभियंता गुडदे यांनी त्यांच्या शाखा अभियंता यांना सोबत घेऊन आडगाव राजा येथील रामदास कहाळे यांनी सुरू केलेल्या उपोषण स्थळी भेट देऊन आडगाव राजा ते सावखेड तेजन रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यास सुरवात करून उपोषणाची अखेर सांगता करण्यात आली.
याबतीत सविस्तर असे की आडगाव राजा ते सावखेड तेजन रस्त्यांवरील ठीक ठिकाणी खड्डे पडल्यामुळे आडगाव राजा सह परिसरातील नागरिकांना यांचा त्रास होत होता या अनुषंगाने रामदास कहाळे यांनी 20 ऑगस्ट रोजी तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन सदर खड्डे बुजविण्यात यावे अशी मागणी करून खड्डे न बुजविल्यास आमरण उपोषणाचा इशारा दिला होता परंतु कुठलीच कार्यवाही न झाल्याने रामदास कहाळे यांनी 2 सप्टेंबर रोजी आडगाव राजा येथे आमरण उपोषणाला सुरुवात केली होती . आडगाव राजा व सावखेड तेजन या रस्त्यावरील खड्डया संदर्भात व रामदास कहाळे यांचे आमरण उपोषण ही बाब नितीन शेळके,नितीन कांयदे , सिद्धार्थ जाधव यांच्या यांनी आमदार मनोज कायंदे यांच्या निदर्शनास आणून दिली आणि लगेच आमदार मनोज कायंदे यांनी मुंबई वरून तात्काळ कार्यकारी अभियंता गुडदे यांना संपर्क करून ताबडतोब आडगाव राजा व सावखेड तेजन रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यास सुरवात करा आणि उपोषण सोडवा असे निर्देश दिले यावरून आज कार्यकारी अभियंता यांनी उपोषण स्थळी भेट देऊन उपोषण स्थळी भेट दिली आणि तात्काळ खडे बुजविण्यास सुरवात केली आणि उपोषण निंबू पाणी देऊन सोडविले यावेळी प्रदीप बिल्होरे पाटील, विजय कुहिरे, बुद्धू चौधरी यांच्या सह जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.रामदास कहाळे यांनी सुरू केलेल्या उपोषणा दरम्यान गावातील सर्व च जेष्ठ श्रेष्ठ गावकरी मंडळी दोन्ही दिवस प्रामुख्याने हजर होती.
