नागरे महाविद्यालयात संपन्न झाले रानमेवा फळभाज्यांचे प्रदर्शन

IMG-20250903-WA0055

सिंदखेडराजा (अनिल दराडे) स्थानिक दुसरबीड दि 03 येथील नारायणराव नागरे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व वनस्पती शास्त्र विभागाच्या वतीने रानमेवा फळभाज्यांचे प्रदर्शनाचे आयोजित करण्यात आले होते
या प्रदर्शनाचे उद्घाटन मा. तोतारामजी कायंदे साहेब (अध्यक्ष भगवान बाबा प्रसारक मंडळ रुम्हना तथा माजी आमदार सिंदखेड राजा) यांच्या हस्ते करण्यात आले त्यांनी विद्यार्थ्यांना रानातील फळभाज्यांविषयी माहिती असलेल्या फळभाज्यांचे शरीरासाठी आवश्यक असणारी ऊर्जा निसर्गाने ऋतूनुसार रान फळभाज्यांची निर्मिती केल्याचे त्यांनी म्हटले आहे

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विजय नागरे सर आधीसभा तथा व्यवस्थापन परिषद सदस्य संत गाडगेबाबा अमरावती यांनी रानमेवा फळभाज्या कार्यक्रमाचे आयोजन करण्या पाठीमागील महाविद्यालयाची भूमिका स्पष्ट करत असताना दिवसें दिवस रान फळभाज्यांचा दुर्मिळ होत आहे त्याविषयी विद्यार्थ्यांना आकलन व्हावे व त्या फळभाज्यांचा संवर्धन करावे याकरिता विद्यार्थ्यांना फळभाज्या रानातून आणण्याचे सांगण्यात आले होते विद्यार्थ्यांनी कंटुले, वाघाटे, झीटूलीची फुले, फांदाची भाजी चिऊळ तरवटा ,पाथरीची भाजी आशा विविध स्वरूपाच्या दुर्मिळ फळभाज्या विद्यार्थ्यांनी आणल्या व त्याचे शरीरासाठी उपयोग काय आहे याविषयी सुद्धा चर्चा करण्यात आली व त्या भाज्या कशा बनवल्या पाहिजेत याविषयी विद्यार्थिनींनी त्याची रेसिपी सांगितली या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद बघून निश्चितच या फळभाज्या जतन करण्यासाठी विद्यार्थी प्रेरणा घेतील आणि या दुर्मिळ फळभाज्या जतन करतील अशी आशा व्यक्त केली या कार्यक्रमाचे आयोजन प्रा. मिलिंद गवई प्रा. नयना गवारे प्रा. दीपक देशमाने प्रा.गणेश घुगे प्रा.सत्यम श्रीवास्तव प्रा.भगवान शिंदे प्रा. सुधाकर तारे प्रा. शंकर महेर प्रा.राम पोखरकर प्रा. देवानंद नागरे प्रा. शेख युनूस गजानन मुंडे अनिल रनमळे यांनी रानमेवा फळभाज्या प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांना फळभाज्या आणण्यासाठी प्रेरित केले व दुर्मिळ फळभाज्या रानामध्ये कोठे मिळतात याविषयी मुलांना याविषयी माहिती दिली व प्रदर्शन यशस्वी केले या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते

You may have missed

error: Content is protected !!