डोणगावमध्ये मच्छरांचा कहर; ग्रामपंचायतीकडे धूरफवारणीची मागणी,आरोग्याच्या धोक्याची घंटा! डोणगावात नागरिकांची धूरफवारणीसाठी आर्त हाक,डेंग्यू-मलेरियाचा धोका टाळण्यासाठी डोणगाव ग्रामपंचायतीला निवेदन….रहेमतिया सोशल ग्रुपचा पुढाकार; गावभर धूरफवारणीची तातडीची गरज….
डोणगाव (बुलढाणा माझा न्युज)गावात गेल्या काही दिवसांत मच्छरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया यांसारख्या आजारांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढली आहे. लहान मुले, शालेय विद्यार्थी, वृद्ध नागरिक यांना याचा विशेष त्रास होत असून गावकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.
या पार्श्वभूमीवर रहेमतिया सोशल ग्रुप डोणगाव तर्फे ग्रामविकास अधिकारी व सरपंच ग्रामपंचायत डोणगाव यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात गावातील प्रत्येक वार्डात तातडीने धूरफवारणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, “गावातील वातावरण दूषित झाले असून मच्छरांच्या प्रचंड वाढीमुळे लोक त्रस्त झाले आहेत. यामुळे मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना आजारांचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने तात्काळ धूरफवारणी करून गाव स्वच्छ आणि सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी पार पाडावी.”
निवेदन देताना रहेमतिया सोशल ग्रुपचे अध्यक्ष ज़ैनुल आबेदीन शेख, , आवेज़ खान पठाण , उस्मान कुरैशी, अतीक खान , इरशाद खान शहानुर खान , शेख शोएबोदिन, हमीद खान, साहिल खान, यांच्यासह इतर पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
ग्रामपंचायतीने लवकरात लवकर कारवाई करून गावकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी सर्वसामान्य नागरिकांचीही अपेक्षा आहे.
