सिंदखेडराजा येथील देशपांडेच्या गणपतीची 400 वर्षाची परंपरा

IMG-20250904-WA0001

सिंदखेडराजा( शहर प्रतिनिधी रवी ढवळे) सिंदखेडराजा येथील देशपांडे यांचा गणपती प्रसिद्ध आहे तब्बल चारशे वर्षांपासून देशपांडे कुटुंबीय त्यांच्या जवळपास आठ पिढ्या वंशपरंपरागत गणपतीची मांडणी करून अकरा दिवस विविध उपक्रम राबवतात देशपांडे यांच्या गणपतीची प्राणप्रतिष्ठा भाद्रपद शुक्ल चतुर्थीला प्राणप्रतिष्ठा करण्यात आली तब्बल अकरा दिवस विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात गणपती अथर्वशीर्ष यासारख्या अनेक सेवा घेण्यात येतात गणपती स्थापनेपासून नंतर अकराव्या दिवशी गणपतीचे विसर्जन करण्यात येते गणपती विसर्जन सुद्धा ऐतिहासिक व पुरातन असलेले कासार तळे येथे करण्यात येते ही परंपरा सुद्धा कायम आहे

चौकट

या गणपती संदर्भात गणपती स्थापनेपासून विसर्जनापर्यंत सर्व कामकाज पाहणारे गणपती भक्त विनायक त्रिंबक देशपांडे यांनी सांगितले गणपती हे आमचे आराध्य दैवत असून गणपती उत्सव आमच्यासाठी वर्षभरातील सर्व सणांमध्ये मोठा उत्सव असल्याचे त्यांनी सांगितले

You may have missed

error: Content is protected !!