मुख्यमंत्री सामूहिक पंचायत राज अभियानाची सुरुवात
सिंदखेडराजा (अनिल दराडे)
मुख्यमंत्री सामूहिक पंचायत राज अभियान १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत राज्यभर राबविण्यात येणार आहे. या अभियानाअंतर्गत ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद तसेच विभाग व राज्य स्तरांवर विविध उपक्रम, प्रशिक्षण, स्पर्धा व ग्रामसभांचे आयोजन करण्यात येणार आहे.

अभियानाचे वेळापत्रक :
१ ते ५ सप्टेंबर : तालुका स्तरावरील प्राथमिक प्रशिक्षण
६ ते १० सप्टेंबर : गटस्तरीय प्राथमिक प्रशिक्षण
१७ सप्टेंबर २०२५ : राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा आयोजित करण्यात येणार
या ग्रामसभांमध्ये अभियानाचे उद्दिष्ट, उपक्रम, शासकीय योजना व जनसहभाग याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच प्रत्येक तालुक्यासाठी तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असून ग्रामसभेच्या यशस्वी आयोजनासाठी देखरेख समित्या कार्यरत राहणार आहेत.
समित्या :
जिल्हा स्तर समिती : मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली
विभागीय स्तर समिती : विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली
राज्य स्तर समिती : प्रधान सचिव (पंचायत राज विभाग) यांच्या अध्यक्षतेखाली
पुरस्कार व प्रोत्साहन :
अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध स्तरांवर पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत.
पंचायत समिती स्तरावरील स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकास अनुक्रमे ५० हजार, ३० हजार व २० हजार रुपये बक्षीस दिले जाणार.
विभागीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या समितीला १ कोटी रुपये, तर राज्य स्तरावर प्रथम क्रमांकास ५ कोटी रुपये इतकी पारितोषिके देण्यात येणार आहेत.
याशिवाय उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना जिल्हा परिषद व राज्य सरकारच्या तर्फे विशेष गौरव करण्यात येणार आहे.
या अभियानातून ग्रामपंचायतींना सक्षम करणे, जनतेला योजनांची माहिती पोहचविणे आणि ग्रामविकासाला गती देणे हा उद्देश आहे.या कार्यक्रमाला गटविकास अधिकारी व बी ओ निकम ग्रामपंचायत विकास अधिकारी संघटनेचे ता अध्यक्ष झीणे व सरपंच व ग्रामसेवक इत्यादी उपस्थित होते
