वरवंड येथे कृषी विभागा मार्फत कृषी शाळा संपन्न, शेतकऱ्यांना सोयाबीन व तुर पिकावर नियंत्रणा बाबत केले मार्गदर्शन….
बुलढाणा (बुलढाणा माझा न्युज)आज दि 04.09.2025 रोजी मौजे वरवंड येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान अन्नधान्ये पिके 2025-26 योजने अंतर्गत पीक पद्धतीवर आधारित वरवंड येथे सोयाबीन+तूर शेतकरी प्रशिक्षण घेण्यात आले. त्यामध्ये उपस्थित शेतकऱ्यांना सोयाबीन व तूर पिकाबद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. सदर प्रशिक्षणा साठी उपस्थित प्रमुख मार्गदर्शक कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा येथील कीटक शास्त्रज्ञ डॉ.प्रवीण देशपांडे यांनी सोयाबीन व तूर पिकावरील किडींची ओळख व नियंत्रण उपायोजना याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित तालुका कृषी अधिकारी, बुलढाणा श्री.अजय वाढे यांनी कृषी विभागाच्या योजना तसेच AI कृषी विस्तार ॲप आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी कसे वापरावे याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. सदर शेतकरी प्रशिक्षणासाठी मंडळ कृषी अधिकारी श्री व्हि.व्ही.गवई, उप कृषी अधिकारी श्री आर. टी. म्हस्के हे उपस्थित होते. गावातील लोकप्रतिनिधी, पत्रकार तसेच सरपंच बाळाभाऊ जेऊघाले व गावातील सोयाबीन+तूर उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर प्रशिक्षणाचे आयोजन सहायक कृषि अधिकारी, श्री.सतीश सोनुने यांनी यांनी केले होते. प्रशिक्षण संपल्यानंतर प्रत्यक्ष सोयाबीन+तूर प्रक्षेत्रावर भेट देऊन शेतकऱ्यांच्या विविध अडचणींचे निरसन करून प्रशिक्षण संपन्न करण्यात आले.
