भूमी अभिलेख कार्यालयाच्या माध्यमातून शासन आपल्या दारी, महास्वामित्व योजनेअंतर्गत नागरिकांना सनद प्रमाणपत्राचे वाटप…

IMG-20250904-WA0022

सिंदखेडराजा( अनिल दराडे )
भूमी अभिलेख कार्यालयाच्या माध्यमातून सध्या नागरिकांना मालमत्ता पत्रक वाटप करण्यात येत आहे. स्वामित्व योजना मालमत्ता पत्रक वितरण हा उपक्रम महसूल व भूमी अभिलेख विभाग ,ग्राम विकास विभाग आणि भारतीय सर्वेक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमानातून पार पडला.

स्वामीत्व योजना ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. महाराष्ट्र मध्ये महास्वामित्व योजनेअंतर्गत नागरिकांना सनद वाटप करण्यात येत आहे. भूमी अभिलेख कार्यालय सिंदखेड राजा येथे नागरिकांना सनद वाटप करण्यात आल्या आहेत.
या मालमत्ता पत्रकाच्या माध्यमातून तंत्रज्ञानाची साथ व जमिनीचा अधिकार आपल्या हातात येणार आहे. हे मालमत्ता पत्रक आपल्या घराच्या जागेचे महत्वाचे कागदपत्र असणार आहे.
हे मालमत्ता पत्रक म्हणजे सेवा एक फायदे अनेक असे आहे,

1) अत्याधुनिक ड्रोनच्या सहाय्याने गावठानातील मिळकतीचे अचूक मोजमाप ,नकाशा आणि मालमत्ता पत्रक तयार करणे आता झाले सोपे व जलद

2) सीमा निश्चिती आणि मोजमापाची कामे आता अधिक प्रभावीपणे आणि वेळेत पूर्ण होतील

3) मालमत्तेची कायदेशीर मालकी आणि सुरक्षिततेची हमी

4) कर्ज मिळण्याची सुलभ सुविधा

5) जमिनीशी संबंधित मतभेदांचे त्वरित निराकरण
मालमत्तेचे विभाजन अधिक सुलभ

6) गावांच्या आर्थिक प्रगतीला नवी दिशा व चालना
या मालमत्ता पत्रकातून वरील सर्व फायदे नागरिकांना मिळणार आहेत.
भूमी अभिलेख सिंदखेड राजा कार्यालयाचे तीन पथके हे शिंदी, मोहाडी आणि रताळी या गावामध्ये गेले होते आणि त्यांनी तिथे मार्गदर्शन शिबीर घेऊन तेथील नागरिकांना सनद प्रमाणपत्राचे महत्व सांगून त्याचे वाटप केले आहेत.या तिन्ही पथकाच्या माध्यमातून एकूण 1,01,000/- ₹(एक लाख एक हजार रुपये ) एवढी विक्रमी सनद फीस ची वसुली करण्यात आली.
शिंदी येथील पथकामध्ये उप अधीक्षक मारोती थोरवे, भुमापक प्रकाश शिंदे हे होते तर मोहाडी येथील पथकामध्ये निमतनदार राजाराम चोखट, भुमापक आयुष नायगावकर आणि रताळी येथील पथकामध्ये परिरक्षण भुमापक गोपाल वाघमारे,श्रीकांत बुलबुले छाननी भुमापक उपस्थित होते.
सिंदखेड राजा येथील कार्यालयामध्ये मनुष्यबळ कमी असून सुद्धा असे लोकाभिमुख कामे करून कार्यालयाला थेट जनतेपर्यंत पोहचवण्याचे काम सध्या उप अधीक्षक मारोती थोरवे आणि पूर्ण टीम करत आहे.

शिंदी येथील सरपंच अशोक खरात आणि ग्रामविकास अधिकारी दिनकर काळे, रताळी येथील सरपंच समाधान पाटील आणि ग्राम विकास अधिकारी, मोहाडी येथील सरपंच बबनराव काळे आणि ग्रामविकास अधिकारी पडघन मॅडम या सर्वानी तसेच सर्व ग्रामस्थांनी खूप सहकार्य केले त्याबद्दल उप अधीक्षक थोरवे यांनी सर्वांचे आभार मानले.

You may have missed

error: Content is protected !!