नगरपालिकेने उत्कृष्ट देखावे व सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या गणेश मंडळांना गणराया पुरस्कार देऊन सन्मान करावा,ऍड नाझेर काझी यांची पत्रकार परिषदेमध्ये मागणी

IMG-20250904-WA0019

सिंदखेडराजा( शहर प्रतिनिधी रवी ढवळे) नगरपालिकेच्या वतीने उत्कृष्ट देखावे व चांगले सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या गणेश मंडळांना गणराज पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला जात असे ही परंपरा नगरपालिकेने कायम ठेवावी व पुन्हा नगरपालिकेचे मुख्याधिकारी आशिष बोबडे यांनी गणराया पुरस्कार व दुर्गा उत्सव पुरस्कार पूर्वीप्रमाणे परंपरा कायम ठेवावी व सुरू करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष ऍड नाझेर काझी यांनी सिंदखेडराजा येथे पत्रकार परिषद घेऊन तारीख एक सप्टेंबर रोजी मागणी केली आहे

ऍड नाझेर काझी यांनी सांगितले यापूर्वी मी नगरपालिकेचा नगराध्यक्ष असताना माणिक चौक येथे शहरातील सर्व गणेश मंडळाचा नगरपालिकेच्या वतीने सत्कार करण्यात येत होता हाच पायंडा हीच परंपरा आता कायम राहावी तसेच दुर्गा उत्सव मध्ये सुद्धा हीच परंपरा हाच पांडा आम्ही राबवित असे आता यासाठी नगरपालिकेचे प्रशासक आशिष बोबडे यांना पत्र दिले असून त्यांच्यासोबत या संदर्भात चर्चा सुद्धा केली तसेच उपविभागीय अधिकारी ठाणेदार तहसीलदार व संबंधित प्रशासकीय अधिकारी यांच्यासोबत सुद्धा चर्चा केली व गणराया पुरस्कार देण्याची विनंती केली जेणेकरून सिंदखेडराजा शहरातील गणेश मंडळ त्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांना निश्चितच गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना उभारी मिळेल त्यांचा आत्मविश्वास वाढेल व व्यसनमुक्त व चांगली पिढी घडण्यास मदत होईल त्यांना ऊर्जा मिळेल असे त्यांनी सांगितले

You may have missed

error: Content is protected !!