जय गुरुदेव सांप्रदायिक भजनी मंडळाचा सामाजिक प्रबोधन पर भजन
चिखली (निलेश कोल्हे) चिखली तालुक्यातील पळसखेड सपकाळ येथील जय गुरुदेव सांप्रदायिक भजनी मंडळाचा सामाजिक प्रबोधन पर धोडप व पळसखेड सपकाळ येथील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळामध्ये भजन सेवा. आज महाराष्ट्रातील प्रत्येक गाव खेड्यात भजनी मंडळ पायाला मिळते भजन ,कीर्तन यातून समाजाचे प्रबोधन करत असतात. चिखली तालुक्यातील पळसखेड सपकाळ येथे श्री गुरुदेव आश्रम आहे या ठिकाणी वर्षभरातून अनेक कीर्तनाचे व धार्मिक कार्यक्रम होत असतात यामध्ये जय गुरुदेव सांप्रदायिक भजनी मंडळ आपली कीर्तन सेवेमध्ये सहभागी होत

असतात व श्री संत गजानन महाराज शेगाव नगरी येथे दरवर्षी श्री संत गजानन महाराज प्रगट दिनाला व गोकुळ अष्टमीला पळसखेड सपकाळ येथून पायी दिंडी नेत असतात तसेच गावातील व बाहेरगावी पाचवी व बारादी निमित्त भजन सेवा देत असतात. जय गुरुदेव सांप्रदायिक भजनी मंडळ गणेशोत्सवानिमित्त दिनांक २७ऑगस्ट पासून ते दिनांक ५ सप्टेंबर पर्यंत दररोज रात्री नऊ वाजेपासून ते रात्री एक वाजेपर्यंत भजनी मंडळ धोडप व पळसखेड सपकाळ येथील सार्वजनिक गणेश मंडळातील गणपती येथे नऊ दहा दिवसापासून जय गुरुदेव सांप्रदायिक भजनी मंडळ भजन सेवा देत आहे. या भजनी मंडळामध्ये पळसखेड सपकाळ येथील ह.भ.प.अशोक सपकाळ ,ह.भ.प.अरविंद सपकाळ ,ह.भ.प.विष्णू अंधारे ,ह.भ.प.विनोद कापसे, ह.भ.प.विष्णू सपकाळ ,ह.भ.प.रंगनाथ कुसुंबे ,ह.भ.प.अर्णव सपकाळ ,ह.भ.प.श्रीकृष्ण कापसे,ह.भ.प. पृथ्वीराज सपकाळ ,ह.भ.प.मंगल काळे ही मंडळी नित्यनियमाने भजन सेवा देत आहे.
