मिलाद उन नबीच्या निमित्ताने लोणारमध्ये भव्य रक्तदान शिबिर १४५ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग

IMG-20250906-WA0074

लोणार( यासीन शेख) मिलाद उन नबी (स.अ.व.) या पवित्र दिनानिमित्त जमिअत-ए-उलमा-ए-हिंद, लोणार यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेले भव्य रक्तदान शिबिर दिनांक ५ सप्टेंबर २०२५ रोजी उत्साहात पार पडले. या शिबिरात तब्बल १४५ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून समाजासाठी आदर्श निर्माण केला. यामध्ये जवळपास ४०० रुग्णांना रक्तपुरवठा केला जाऊ शकतो.

या शिबिरात महिला-पुरुष, विद्यार्थी, सैनिक छात्र, तसेच सामाजिक कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. कार्यक्रमाचे उद्घाटन लोणार शहरातील प्रख्यात समाजसेवक प्रकाश भाऊ मापारी, भूषण भाऊ, शेख समद शेख अहमद , नितीन शिंदे, साहेबराव पाटोळे, हाजी शेख मसूद सेठ, पोलिस निरीक्षक निमिष मेहेत्रे, इम्रान खान,नगर सेवक आबेद खान, निसार शेख, इंदिरा गांधी अध्यक्ष शेख गफ्फार सेठ, गुलाब सरदार, गफूर सेट, जफर भाई आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.

रक्तदान शिबिराची सुरुवात सामाजिक कार्यकर्ते शेख हारून शेख जाफर यांचे सर्वप्रथम रक्तदान करून करण्यात आली. तर रिजवान जड्डा यांनी रक्तदान करून शतक पूर्ण केले. त्यांच्या या पुढाकारानंतर अनेक नवीन युवकांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करून मानवतेची खरी सेवा बजावली.

या शिबिरासाठी डॉक्टरांची कुशल टीम, सुरक्षित तपासणी व रक्तसंकलनाची व्यवस्था जियाउलहक नुरुलहक यांच्या निरीक्षणाखाली अमृता ब्लड सेंटर संभाजीनगर यांच्या द्वारे करण्यात आली होती. सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

सलग १४ वर्षे सुरू असलेली ही रक्तदान परंपरा यंदाही यशस्वीरीत्या पार पडल्याने लोणार शहरात समाधान व्यक्त होत आहे. कारण रक्ताची निर्मिती फक्त मानवी शरीरातच होत असल्यामुळे याचे असाधारण महत्व आहे.

या रक्तदान शिबिराला यशस्वी करण्या करिता रिजवान खान करामत खान, वसीफ खान,अल्ताफ हुसैन सर, शेख इकबाल भाई, साबीर अली, वसीम खान सर, अलीम सर, इजहार खान, हाफीज तारिक, हाफीज अनीस, हाफीज राजिक, हाफीज अयाज, हाफीज अ. रहीम,डॉ.नकीब खान इत्यादींसह सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

You may have missed

error: Content is protected !!