शेलू नगरीत गणेश विसर्जन मिरवणूकीला वारकरी संप्रदाय च्या हरीनामाचा गजर जगदंब गणेश मंडळाचा संस्कारी उपक्रम समाजासमोर प्रेरणादायी आदर्श

IMG-20250908-WA0013

सिंदखेड राजा( अनिल दराडे) सिंदखेड राजा तालुक्यातील शेलू येथे श्री गणेश चतुर्थी च्या शुभ मुहूर्तावर 6 सप्टेंबर रोजी जगदंब गणेश मंडळाच्या वतीने गणपती विसर्जन मिरवणूक एक संस्करी पद्धतीने साजरी केली जगदंब गणेश मंडळाने समाजासमोर आगळा वेगळा उपक्रम राबविला गावभर नाद घुमत होता तूच सुखकर्ता तूच दुखवार्ता अवघ्या जणांचा नाथा बापा मोरया रे चरणी ठेवितो माथा,वारकरी संप्रदाऊतील भजनी मंडळींनी टाळ, मृदूंगाच्या गजरात गणपती बापाची पालखी काढली गळ्यात टाळ, पाऊली खेळत, भजनाच्या तालावर नाचत ही मिरवणूक यशस्वी ठरली हा एक समाजासमोर एक आदर्श उपक्रम साजरा करण्यात आला हे केवळ एक विसर्जन नसून गावातील तरुणांना एक नवा आदर्श, नवा स्वास होता आज हरीनामाचा गजर एकूण डोळ्यात पाणी आले मन भक्ती भावाने भरून आलं हा उपक्रम खऱ्या अर्थाने भक्ती भावाचा जिवंत उपक्रम होता गावातील स्त्रियांनी श्री गणपती चे औक्षण करून सर्व गावातील महिला मंडळ व पुरुष विसर्जनाला सहभागी होते

You may have missed

error: Content is protected !!