जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा उमरद येथे स्वयंशासन दिन साजरा

IMG-20250908-WA0002

सिंदखेड राजा( अनिल दराडे)आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत व शिक्षक दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा उमरद येथे स्वयंशासन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी विद्यार्थ्यांनी शाळेतील संपूर्ण शालेय व्यवस्थापन व कामकाजाची जबाबदारी स्वीकारून ती यशस्वीरित्या पार पाडली.

शाळेच्या दैनंदिन कारभाराचे मुख्याध्यापक म्हणून श्वेता बरांडे यांनी कामकाज पाहिले, तर शिक्षक म्हणून रिया समदानी, स्नेहल नागरे, मयुरी सानप, पूनम सांगळे, ईश्वरी जाधव, साक्षी केकाण, चेतना केकाण, स्नेहल जायभाये, ईश्वरी भोसले, राजश्री टापरे, वैष्णवी मुळे, प्रांजल सोनुने, प्रांजल सोसे, अनुजा गिरी, सानिका घायवट, पावणी नागरे, श्रुतिका सुपेकर, श्रीमयी बोडखे आदी विद्यार्थिनींनी अध्यापनाचा अनुभव घेतला.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना नवीन अनुभव मिळाला असून हा अनुभव चिरकाल स्मरणात राहील, असे समाधान व्यक्त करत शाळेचे मुख्याध्यापक श्री. दराडे सर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

You may have missed

error: Content is protected !!