चिखलीत शिवसेना विसर्जन मिरवणुकीवर पुष्पवृष्टी ; २४ मंडळांचा सन्मान व प्रत्येकी पाच हजारांचे प्रोत्साहनपर बक्षीसकेंद्रीय आयुष मंत्री ना. प्रतापराव जाधव व युवासेना जिल्हाप्रमुख ऋषी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम….
शहरप्रमुख विलास घोलप यांच्या संकल्पनेतून गणेश मंडळांना प्रत्येकी पाच हजार रुपये व सन्मानपत्र
आ. सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती ; मंडळांत उत्साहाचं वातावरण
चिखली (निलेश कोल्हे)चिखली गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर चिखली शहरात शिवसेना तर्फे भव्य पुष्पवृष्टी करण्यात आली. केंद्रीय आयुष मंत्री ना. प्रतापराव जाधव व युवासेना जिल्हाप्रमुख ऋषी जाधव यांच्या मार्गदर्शनात शिवसेना शहरप्रमुख विलास घोलप यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाचे आयोजन झाले.
यावेळी चिखली शहरातील एकूण २४ सार्वजनिक गणेश मंडळांना प्रत्येकी पाच हजार रुपयांची प्रोत्साहनपर पावती आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या सन्मानामुळे गणेश मंडळांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमाला चिखली विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील, शिवसेना नेते भास्करराव मोरे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख शिवाजीराव देशमुख, राष्ट्रवादी जिल्हा कार्याध्यक्ष शंतनू बोंद्रे, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष संतोष परिहार, शिवसेना चिखली तालुकाप्रमुख गजानन मोरे, युवासेना उपजिल्हाप्रमुख रोहित खेडेकर, ना. प्रतापराव जाधव यांचे संपर्क अधिकारी संपर्क अधिकारी नीरज काकडे,
शिवसेना नेते कपिल खेडेकर, कैलास भालेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य शरद हाडे, अनमोल ढोरे पाटील, दैनिक आम्ही चिखलीकरचे संपादक छोटू कांबळे, विदर्भ दर्पणचे संपादक मंगेश पळसकर, पत्रकार युसुफ शेख, काशिनाथ शेळके, सेवानिवृत्त तलाठी काकडे, शिवाजी शिराळे, पवन चिंचोले, विक्रांत नकवाल, मनोज वाघमारे, विठ्ठल जगदाळे, अमर सुसर, राका मेहेत्रे, राहुल शेलकर, बंडू नेमाने, दीपक मगर, सुनील धंदर सर, अमर काळे,
शेख बाबू भाई, शेख इम्रान, राजेश पवार, तसेच चिखली शहरातील विसर्जन मिरवणुकीचे सर्व सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रत्येक गणेश मंडळाला प्रोत्साहनपर बक्षिसे व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
या उपक्रमामुळे चिखलीतील विसर्जन मिरवणुकीला अनोखी झळाळी प्राप्त झाली. “गणेशोत्सव हा समाजाला एकत्र आणणारा आणि संस्कृतीला बळ देणारा उत्सव आहे. त्यात गणेश मंडळांचा उत्स्फूर्त सहभाग लक्षात घेऊन त्यांचा सन्मान करणे ही आमची जबाबदारी आहे,” असे शिवसेना शहरप्रमुख विलास घोलप यांनी सांगितले.
