चिखलीत शिवसेनेतर्फे विसर्जन मिरवणुकीवर पुष्पवृष्टी ; २४ मंडळांचा सन्मानमंगेश पळसकर व काशिनाथ शेळके यांच्या हस्ते युवा संघर्ष गणेश मंडळ सन्मान……
चिखली( निलेश कोल्हे) चिखली शहरात शिवसेनेच्या वतीने गणपती विसर्जन मिरवणुकीवर भव्य पुष्पवृष्टी करण्यात आली. या प्रसंगी शहरातील २४ सार्वजनिक गणेश मंडळांना प्रत्येकी पाच हजार रुपयांची प्रोत्साहनपर पावती व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी दैनिक विदर्भ दर्पण चे संपादक मंगेश पळसकर व दैनिक झुंजार दस्तकचे संपादक काशिनाथ शेळके यांच्या हस्ते युवा संघर्ष गणेश मंडळाला प्रोत्साहनपर सन्मानपत्र आणि पाच हजार रुपयांची रोख पावती प्रदान करण्यात आली.
सदर उपक्रम केंद्रीय आयुष मंत्री ना. प्रतापराव जाधव साहेब व युवासेना जिल्हाप्रमुख ऋषी दादा जाधव यांच्या मार्गदर्शनात, तर शिवसेना शहर प्रमुख, मोठे बंधू विलासदादा घोलप यांच्या संकल्पनेतून चिखली शिवसेना सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांच्या सक्रिय सहभागामुळे हा कार्यक्रम यशस्वी पार पडला.
यावेळी शिवसेना नेते भास्करराव मोरे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख शिवाजीराव देशमुख, राष्ट्रवादी जिल्हा कार्याध्यक्ष शंतनू बोंद्रे, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष संतोष परिहार, शिवसेना चिखली तालुकाप्रमुख गजानन मोरे, युवासेना उपजिल्हाप्रमुख रोहित खेडेकर, ना. प्रतापराव जाधव यांचे संपर्क अधिकारी संपर्क अधिकारी नीरज काकडे, शिवसेना नेते कपिल खेडेकर, कैलास भालेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य शरद हाडे, अनमोल ढोरे पाटील, विदर्भ दर्पणचे संपादक मंगेश पळसकर, दैनिक झुंजार दस्तक संपादक काशिनाथ शेळके पत्रकार युसुफ शेख, छोटू कांबळे, सेवानिवृत्त तलाठी काकडे, शिवाजी शिराळे, पवन चिंचोले, विक्रांत नकवाल, मनोज वाघमारे, विठ्ठल जगदाळे, अमर सुसर, राका मेहेत्रे, राहुल शेलकर, बंडू नेमाने, दीपक मगर, सुनील धंदर सर, अमर काळे,
शेख बाबू भाई, शेख इम्रान, चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेश पवार, तसेच चिखली शहरातील विसर्जन मिरवणुकीचे सर्व सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
