बुलढाणा जिल्हा पोलीस दलातर्फे मिशन परिवर्तन अंतर्गत दांडगे विद्यालयात वर्ग 8 ते 10 मध्ये निबंध स्पर्धा संपन्न…

IMG-20250906-WA0100

बुलढाणा (बुलढाणा माझा न्युज)धाडसे ठाणेदार सन्माननीय प्रतापजी भोस साहेब व पोलीस उपनिरीक्षक केंद्रे साहेब तथा सहकारी यांच्या मार्गदर्शनातून दांडगे विद्यालयात निबंध स्पर्धा संपन्न
वर्ग 5 ते 10 च्या विद्यार्थ्यांशी धाडचे सन्माननीय ठाणेदार भोसरी व पोलीस उपनिरीक्षक केंद्र साहेब यांनी साधला संवाद
धाड – दिनांक 26 ऑगस्ट 2025 रोजी बुलढाणा जिल्हा पोलिस दलातर्फे मिशन परिवर्तन अंतर्गत दांडगे विद्यालयात इयत्ता आठवी ते दहावीच्या मुलांची व्यसनाधीनता तरुणाईला लागलेली कीड,नशा मुक्त समाजासाठी उपाय योजना,व्यसनमुक्ती काळाची गरज व नशा मुक्त भारत या विषयावर निबंध स्पर्धा संपन्न झाली
या निबंध स्पर्धेमध्ये दांडगे विद्यालयाच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला या निबंध स्पर्धेमध्ये 500 शब्दांची मर्यादा होती तसेच निबंधाच्या शेवटी एक घोषवाक्य अनिवार्य होते
.या निबंध स्पर्धेमध्ये पोलीस दलामार्फत प्रथम पुरस्कार विद्यार्थ्यांना 3000 हजार रुपये द्वितीय पुरस्कार विद्यार्थ्यांना 2000 हजार रुपये व तृतीय पुरस्कार विद्यार्थ्यांना 1000 रुपये रोख रक्कम बक्षीस प्रशस्तीपत्र व ट्रॉफी देऊन मा.पोलीस अधीक्षक विद्यार्थ्यांना सन्मानित करणार आहेत.अजून सदर निबंध स्पर्धेचा निकाल लागलेला नाही,भविष्यात आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांचा यामध्ये क्रमांक आल्यास त्यांना जिल्हा स्तरावर सन्मानित करण्यात येणार आहे.
या कार्यक्रम प्रसंगी दांडगे विद्यालयाचे सचिव सन्माननीय उमेश भाऊ दांडगे,धाडचे ठाणेदार सन्माननीय प्रताप भोस साहेब
,धाड पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक केंद्रे साहेब,विद्यालयाचे प्राचार्य संतोष डवले सर,उपप्राचार्य जाधव सर,उपप्राचार्य चव्हाण सर, पोलीस माळी साहेब,पोलीस सहकारी विशाल आपार,सोनुने भाऊ उपस्थित होते

You may have missed

error: Content is protected !!