गणेश मंडळाच्या उत्कृष्ट सादरीकरणाने वेधले चिखलीकरांचे लक्ष…शहर काँग्रेसकडून गणरायावर गुलाब पुष्पवृष्टी…..

IMG-20250907-WA0003

चिखली (निलेश कोल्हे) शहरात गणेशोत्सव धुमधडाक्यात व मोठया उत्साहात आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. दर सालाबादा प्रमाणे याही वर्षी विविध सांस्कृतीक व सामाजिक कार्यक्रमात अग्रेसर असलेल्या छत्रपती शिवराय क्रीडा प्रतिष्ठाणच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासुन प्रोत्साहन समितीच्या माध्यमातुन गणेशोत्सवाच्या काळात गणेश मंडळांचा उत्साह वाढविण्यासाठी उपक्रम राबविण्यात येतात. सांस्कृतीक विशवातील मानबिंदु ठरलेल्या छत्रपती शिवराय क्रीडा प्रतिष्ठाणच्या प्रोत्साहन समितीला चिखलीकरांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळतो. याहीवर्षी प्रतिष्ठाण व चिखली शहर परिसरातील गणेश मंडळांनी देखाव्यांचे उत्कृष्ठ सादरीकरण केले.. या मंडळांच्या श्री मुर्तींवर गुलाब वृष्टी शहर काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. गणेश मिरवणूकी दरम्यान ढोलताषे, डि.जे., बॅंन्डृृ इत्यादी पारंपारीक वाद्यांनी चिखली नगरी दुमदुमली होती.

यावेळी व्यासपीठावर हिरकणी महिला प्रतिष्टाणच्या संस्थापक अॅड.सौ. वृषालीताई बोंद्रे, शहर अध्यक्ष राहुल सवडतकर,कुणाल बोंद्रे, डाॅ. मोहमंद इसरार, प्राचार्य निलेश गावंडेसर, दिपक देशमाने, नंदुभाउ सवडतकर, डाॅ. सत्येंद्र भुसारी, माजी शहर अध्यक्ष अतहरोद्यीन काझी,
जि.प.सदस्या डाॅ. ज्योतीताई खेडेकर, महिला काँग्रेसच्या सौ. विद्याताई देशमाने, सचिन बोंद्रे, श्रीराम झोरे, रविंद्र तोडकर, प्रदिप पचेरवाल, देव्रत बोंद्रे, अमिनखाॅ उमस्मानखाॅ, डिगांबर देशमाने, शहेजादअल्ली खान, शीवराज पाटील, कैलास खराडे, खलील बागवान, जाकीर शेख, डाॅ. अमोल लहाने, विलास कंटुले, दिपक थोरात, नजिर कुरेशि, अजिस भाई, सतिष शीदे, डाॅ. संजय घुगे, डाॅ. रविंद्र कमळस्कर, नितीन वाघ, प्रकाश सपकाळ, नाहेद खान, बंडुभाउ कुळकर्णी, गणेश जवंजाळ, समाधान आकाळ, मिलींद मघाडे, प्रकाष मगर सर, शकील भाई, राजेश लढ्ढा, राजेश खरात, भारत देशमाने, अकिल खान, मो.सोहील, सदानंद मोरंगजे, व्यंकटेश रिंढे, कैलास जंगले, शुभम बुरकुल, विकी जमदार, बाशिद खान, अमित कोटवे, यांची उपस्थिती होती. तर परिक्षक म्हणुन प्रा. किशोर वळसे सर, प्रा. उन्मेश जोशि, प्रा. प्रकाष मगर सर, मुकींद खरात, प्रा. सागर गवई सर यांनी काम पहिले.

प्रा.डॉ. निलेश गावंडे  देणार श्री गणपती विसर्जन प्रोत्साहनपर  बक्षीसे

बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे हे छत्रपती शिवराय प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांच्या कल्पनेतुन गेल्या अनेक वर्षापासुन दरवर्षी गणेश उत्सव कार्यकाळात शहरातील गणेश मंडळाकडुन सादरीकरण करण्यात येणा-या विविध धार्मीक, सांस्कृतीक, व सामाजिक उपक्रमासंह विसर्जन मिरवणुकीतील देखावे इत्यादीचे निरीक्षण प्रोत्साहन समिती मार्फत करण्यात येते. यावर्षीचे प्रायोजक काँग्रेस नेते तथा संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र शिक्षक आघाडीचे प्रा.डॉ.निलेश गावंडे आहेत. प्रथम बक्षीस १५ हजार, द्वितीय ११ तर तृतीय ७ हजार आहे. तसेच मंडळांना प्रोत्साहनपर बक्षीस व सन्मान चिन्हांचे वितरण आगामी चार ते पाच दिवसात होणार आहे.

You may have missed

error: Content is protected !!