ओबीसीचे आरक्षण अबाधित राहण्यासाठी सिंदखेडराजा येथे तहसीलदार यांना निवेदन
सिंदखेडराजा (शहर प्रतिनिधी रवि ढवळे )ओबीसी बांधवाचे आरक्षण अबाधित राहण्यासाठी ओबीसी बांधवांनी सर्वपक्षीय वतीने निवेदन नायब तहसीलदार प्रवीण वराडे यांना दिले तारीख 8 सप्टेंबर रोजी निवेदनात म्हटले आहे की 2 सप्टेंबर 2025 रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून शासन निर्णय क्रमांक सीबीसी 2025 रोजी जारी करण्यात आलेल्या या निर्णयानुसार मराठा समाजातील काही व्यक्तींना मराठा कुणबी समाजाशी जोडून ओबीसी प्रमाणपत्र मिळवून देण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला आहे हा निर्णय शासन निर्णय पूर्णपणे अन्यायकारक व बेकायदेशीर असून या निर्णयामुळे ओबीसी समाजातील सुमारे 400 हून अधिक जाती च्या हक्कावर गदा येणार असून त्यांना शिक्षण व नोकरीच्या क्षेत्रात मिळणारी प्रतिनिधित्व गंभीर स्वरूपाचे असल्याचे त्यांनी सांगितले ओबीसी वर होणारा अन्य थांबवावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सिंदखेडराजा येथील विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटना यांनी दिला आहे निवेदन देताना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी अजित पवार पक्ष शिंदे शिवसेना शरद पवार राष्ट्रवादी पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महात्मा फुले समता परिषद सावता परिषद यांच्यासह अन्य विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व पक्ष कार्यकर्ते निवेदन देताना होते
