सरकारी महिला नोकरदार यांनी मारला लाडक्या बहिणीवर डल्ला ग्रामसेविकां महिलाचे नाव लाडक्या बहिणींच्या यादीत.खात्यात जमा झाले हप्ते, पंचायत समिती (देऊळगाव राजा) प्रशासनात खळबळ

IMG-20250910-WA0009

देऊळगाव राजा( एकनाथ माळेकर)राज्य शासनाने गरजू महिलांसाठी सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या यादीत चक्क ग्रामसेविक पदावर असलेल्या दोन महिलांची नावे आल्याने पंचायत समिती प्रशासनात खळबळ उडाली आहे. सदर गैर प्रकार समोर आल्यानंतर संबंधित ग्रामसेविकेने मी लाडकी बहिण योजनेत अर्ज केले नसल्याचे सांगितले असले तरी ग्रामसेविकेच्या खात्यात आतापर्यंत १२ हप्ते पडल्याची माहिती प्राप्त झाली आहे. शासकीय सेवेत कार्यरत असतानाही लाडक्या बहिणीचा लाभ घेण्यासाठी माहिती लपवून शासनाची फसवणूक करणाऱ्या संबंधित ग्रामसेविके विरुद्ध प्रशासन कठोर कारवाई करणार का हा प्रश्न उपस्थित होत आहे.

देऊळगाव राजा पंचायत समिती अंतर्गत गोंधनखेड व उंबरखेड ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक पदावर कार्यरत असलेल्या मंदाकिनी शरद वाघ व सिंदखेडराजा पंचायत समिती अंतर्गत ग्रामसेवक पदावर कार्यरत काजल प्रेम सिंग राठोड यांची नावे जिल्हा परिषदेने पंचायत समितीकडे पाठविलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजने च्या पात्र यादीत नाव असल्याची गंभीर बाब अघडकीस आली आहे. सन २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य शासनाने संपूर्ण महाराष्ट्रात गरजू महिलांना सक्षम आणि स्वाभिमानी बनविण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. सुरुवातीपासूनच राजकीय चर्चेचा विषय ठरलेल्या लाडक्या बहीण योजनेत अर्ज करणाऱ्या असंख्य गरजू महिला कागदपत्र अभावी अपात्र ठरल्याने या

योजनेपासून वंचित राहिल्या आहे. तर आर्थिक दृष्ट्या सदन कुटुंबातील हजारो महिला शासनाच्या डोळ्यात धुळफेक करून सदर योजनेचा पंधराशे रुपये महिना लाभ घेत आहे. परिणामी गरजू महिला सदर योजने पासून वंचित तर मोठ्या कुटुंबातील सदन महिला लाभार्थी महिला लाडक्या बहिणी असल्याचे वास्तव सदर योजनेतुन दिसत आहे. दरम्यान नुकतेच जिल्हा परिषदेच्या माध्यमाने बुलढाणा जिल्ह्यातील सर्व तालुका निहाय लडकी बहीण योजना | वास्तविकता दर्शविणारी यादी प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये देऊळगाव राजा पंचायत समितीत ग्रामसेवक पदावर कार्यरत मंदाकिनी शरद वाघ या नावासमोर ग्रामसेवक पंचायत समिती देऊळगाव राजा असे लिहून आल्याने ग्रामसेवक महिलेने लाडकी बहिण योजनेत अर्ज कसा दाखल केला असा प्रश्न निर्माण झाला. लाडकी बहिण ओयोजना या समाजातील कष्टकरू, आर्थिकदृष्ट्या गरजू महीला साठी आहे

सिंदखेडराजा पं स च्या यादीत ही एक ग्रामसेवक : जिल्हा परिषद बुलढाणा मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या लाडकी बहीण विभागनिहाय यादीत ग्रामसेवक काजल प्रेमसिंग राठोड यांचा पण नाव समाविष्ठ आहे. याबाबत संबंधित ग्रामसेविका यांच्याशी संपर्क केला असता मी अर्ज केला नव्हता मात्र यादीत माझे नाव प्रकाशित झाले आहे. मात्र मी या योजनेचा लाभ घेतला नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे पण त्यांच्या खात्यावर बरा हापतयाचे पैसे आलेले आहे

हि योजना दृष्ट्या कमकुवत असलेल्या गरजू महिलांना स्वाभिमानाने जगता येईल, त्या सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम जीवन जगू शकतील या उद्देशाने राज्य सरकारने एक महत्त्वकांक्षी योजना सुरू केली. मात्र शासनाच्या ह्या योजने च्या सकारात्मक उद्देशाला ग्रामसेवक पदावर शासकीय नोकरीत असलेल्या महिलानी छेद देण्याची लज्जास्पद कृती समोर आली आहे. शासकीय नोकरीत असूनही समाजातील गरीब गरजू महिला भगिनींच्या हक्कावर घाला घालण्याचे कार्य महिला ग्रामसेवक यांच्या कडून घडल्याचा निंदनीय प्रकार उघडकीस आला आहे. शासकीय नोकरीत असलेल्या महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ घेता येणार नाही अशी स्पष्ट अट असूनही सदर योजनेत ग्रामसेवक महिलांनी ऑनलाइन अर्ज दाखल करून शासनाला गंडा घालण्याचे कार्य केले आहे.

माझ्या नातेवाईकांनी माझ्या नावाने अर्ज दाखल केला. मात्र अकाउंट मध्ये पडलेली रक्कम मी विड्रॉल केली नाही. सदर योजनेचा लाभ मला नको म्हणून मी जिल्हा परिषदेकडे लिखित स्वरूपात अर्ज दाखल केले आहे अशा प्रकारची कबुली गोंदनखेड येथील ग्रामसेविका मंदाकिनी वाघ यांनी दिली मात्र केलेल्या अर्जाची दुय्यम झेरॉक्स प्रत देण्यास त्यांनी टाळाटाळ केली.

लाडक्या बहिणी योजनेत नाव आलेल्या ग्रामसेवक मंदाकिनी वाघ त्यांनी स्वतः सदर योजनेत अर्ज केल्याचे मला सांगितले, त्यांच्या खात्यात काही हप्ते आले मात्र आता त्यांना सदर योजनेचा लाभ बंद झाले असे त्यांनी मला दोन दिवसापूर्वी सांगितले त्यावेळी मी त्यांना सदर लाभ नको म्हणून लेखी देण्याचे निर्देश दिले. तसेच घेतलेल्या लाभाची रक्कम शासनाकडे परत करण्याचे सांगितले आहे.

  • तारामती मुंडे, महिला बाल विकास अधिकारी पंचायत समिती देऊळगाव राजा

You may have missed

error: Content is protected !!