पांढरदेव सरपंचावरील खोटे गुन्हे तातडीने मागे घ्या; अन्यथा जिल्हाभर तीव्र आंदोलनाचा इशारा ….

IMG-20250910-WA0005

चिखली( एकनाथ माळेकर)चिखली तालुक्यातील पांढरदेव ग्रामपंचायतीचे सरपंच चेतन रामकृष्ण म्हस्के यांच्यावर दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे तातडीने मागे घ्यावेत, अशी मागणी अखिल भारतीय सरपंच संघटनेतर्फे तहसीलदार चिखली यांच्याकडे करण्यात आली आहे. अन्यथा जिल्हा तसेच तालुका स्तरावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा चिखली तालुका सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष सतीश भुतेकर व उपाध्यक्ष प्रदीप सोळंके इतर संपूर्ण चिखली तालुक्यातील सरपंचांनी इशारा दिला आहे.

काय आहे प्रकरण?

दि. ४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी साडेआठ वाजता जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाईपलाईन कामाच्या संदर्भात गावातील तेजराव अंकुशराव खेडेकर यांनी सरपंच चेतन म्हस्के यांच्याशी वाद घातला. या वादावेळी खेडेकर यांनी सरपंचांना अशलिल शिवीगाळ केली. सरपंच म्हस्के यांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबीयांवर अमडापूर पोलिस ठाण्यात भारतीय दंड विधानातील विविध कलमांखाली (115/2, 118/1, 333, 351/2, 351/3, 189/1, 189/2, 191/1, 191/2 व 190/10) खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सरपंच संघटनेचा इशारा

अखिल भारतीय सरपंच संघटनेने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की –

सरपंचावर लादलेले खोटे गुन्हे तातडीने मागे घेण्यात यावेत.

अन्यथा जिल्हाभरात सरपंच संघटना मोठ्या प्रमाणावर तीव्र आंदोलन उभे करेल.

पाईपलाईनच्या कामाच्या कारणावरून वाद वाढवून सरपंचाला लक्ष्य केले जात असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे.

You may have missed

error: Content is protected !!