महसूल सेवकांना चतुर्थ श्रेणी दर्जा देण्याची मागणी; १२ सप्टेंबरपासून बेमुदत धरणे आंदोलनाची घोषणा

Screenshot_2025-09-10-07-41-53-21_6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7

सिंदखेडराजा( अनिल दराडे)विदर्भ महसूल सेवक संघटना, तालुका शाखा सिंदखेडराजा तर्फे महसूल सेवक (कोतवाल) पदास शासकीय चतुर्थ श्रेणी दर्जा देण्याच्या मागणीसाठी निवेदन तहसीलदार यांना सादर करण्यात आले. शासनाने ११ सप्टेंबर २०२५ पर्यंत मागणी मान्य न केल्यास १२ सप्टेंबरपासून महसूल मंत्री यांच्या कार्यक्षेत्रात बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

संघटनेच्या मागण्यांमध्ये महसूल सेवकांना तात्काळ चतुर्थ श्रेणी लागू करणे, तोपर्यंत किमान ₹३०,००० मानधन देणे, ११/१२/२०२४ चा राजपत्र रद्द करणे, महसूल विभागातील पदांमध्ये ८० टक्के राखीव ठेवणे, चप्पल भत्ता ₹१० वरून ₹३०० पर्यंत वाढवणे, तसेच तलाठी व ग्रामविकास अधिकारी पदांच्या भरतीमध्ये ५० टक्के आरक्षण देणे अशा विविध मागण्यांचा समावेश आहे. याशिवाय सेवेनिवृत्त महसूल सेवकांना ₹१५,००० पेन्शन, टी.ए. बिल वेळेत देणे, खाजगी ऑपरेटर बंद करणे, तसेच इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवा सुविधा लागू करण्याच्या मागण्या करण्यात आल्या आहेत.

आंदोलनाची रूपरेषा :

१० सप्टेंबर : काळ्या फिती लावून कामकाज.

११ सप्टेंबर : तालुका पातळीवर एकदिवसीय लक्षवेधी धरणे.

१२ सप्टेंबरपासून : महसूल मंत्री यांच्या कार्यक्षेत्रात (क्रीडा संकुल, कोराडी) बेमुदत कामबंद धरणे आंदोलन व साखळी उपोषण.

या निवेदनावर तालुका शाखेचे अध्यक्ष संजय आटोळे, उपाध्यक्ष नीता सोनुने, सचिव रामेश्वर खरात यांच्यासह तालुक्यातील विविध गावांतील पदाधिकारी व सदस्यांनी सह्या केल्या आहेत.

You may have missed

error: Content is protected !!