पीक पाहणी नोंदणीची १५ सप्टेंबरपर्यंत अंतिम मुदत!शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी DCS ॲपद्वारे नोंद करण्याचे तहसीलदार अजित दिवटे यांचे आवाहन!
सिंदखेडराजा(अनिल दराडे )
शेतकरी स्तरावर पीक पाहणी नोंदणीची अंतिम मुदत १५ सप्टेंबर २०२५ निश्चित करण्यात आली असून, सर्व शेतकऱ्यांनी वेळेत नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन सिंदखेडराजा चे तहसीलदार अजित दिवटे यांनी केले आहे.
पीक पाहणीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांची माहिती ई-पीक पाहणी DCS मोबाईल ॲपच्या माध्यमातून भरायची आहे. निर्धारित मुदतीत नोंदणी पूर्ण केल्यास शासनाच्या विविध शेतकरी योजनांचा लाभ मिळण्यास सुलभता राहील, असेही त्यांनी नमूद केले.
“सहभाग नोंदवा — समृद्धी साधा! वेळेत नोंदणी करा — शाश्वत शेती घडवा!” या घोषवाक्यांतर्गत महसूल विभागामार्फत ही मोहीम राबविण्यात येत आहे.
