मातृतीर्थाच्यापिंपळ खुट्टा येथील घुगे परिवारातील दोन भावंडांची परदेशात भरारी
सिंदखेडराजा ( अनिल दराडे )मातृतीर्थ सिंदखेडराजा तालुक्यातील पिंपळखुटा गावचे रहिवाशी असलेले गटविकास अधिकारी बि. डी. घुगे यांची दोन्ही मुले मुलगी पूजा डोईफोडे/ घुगे ही इंग्लंड मध्ये तर मुलगा प्रमोद घुगे यांची अमेरिकेत कॅलिफोर्निया मध्ये नामाकींत कंपनी मध्ये निवड झाली असल्यामुळे या दोन घुगे परिवाराच्या भावंडांनी पिंपळ खुट्टा या गावा सह मातृतीर्थाचे नाव रोशन केले आहे .
बि डी घुगे यांची कन्या सौ. पूजा अमोल डोईफोडे / घुगे ही लंडन येथील नामांकित आयटी कंपनीमध्ये १ कोटी रुपयांच्या भक्कम पॅकेजवर निवड झाली असून ती नुकतीच लंडनला रवाना झाली. कोल्हापूर येथे सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत असताना तिने अथक परिश्रम व कौशल्याच्या जोरावर परदेशातील कंपनीत आपले स्थान पक्के केले.
तर दुसरीकडे श्री. घुगे यांचा सुपुत्र प्रमोद घुगे हा आयआयटी वाराणसीतून आपले उच्च शिक्षण पूर्ण करून दोन वर्षे बेंगलोर येथील जे.पी.मॉर्गन कंपनीत कार्यरत होता. त्यानंतर त्याची अमेरिकेतील कॅलिफोर्नियात सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून निवड झाली. प्रमोदला मिळालेले २ कोटी २५ लाख रुपयांचे पॅकेज आज त्याच्या गुणवत्तेची साक्ष देत आहे.
या दोन्ही मुलांनी बालपणी कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक-माध्यमिक शिक्षण घेतले. साध्या शाळेतून घडलेले हे विद्यार्थी आज जागतिक पातळीवर आपला ठसा उमटवत आहेत, ही खरंच संस्कार, मेहनत आणि ज्ञानाची कमाल आहे.
आई–वडिलांच्या संस्कारांची ताकद आणि मुलांच्या जिद्दीचे फळ… आज मातृतीर्थ नगरीच्या मातीला जागतिक कीर्ती लाभली आहे.”
मातृतीर्थ सिंदखेडराजा येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. बी. डी. घुगे यांच्या परिवारातील दोन भावंडांनी आपल्या कर्तृत्वाने परदेशात भरारी घेत गावाचे व कुटुंबाचे नाव उज्ज्वल केले आहे.
आपल्या मुलांच्या या यशाबद्दल श्री. व सौ. घुगे यांनी समाधान व्यक्त करताना सांगितले –
“आमच्या दोन्ही मुलांनी आपल्या बुद्धीमत्तेने, उच्च शिक्षणाने आणि जिद्दीने घर, गाव व देशाचे नाव उज्ज्वल केले. आज आमच्या डोळ्यांतील पाणी हे आनंदाश्रू आहेत, अभिमानाने भरलेले आहेत.”
आज सिंदखेडराजा नगरीत घुगे परिवाराचे नाव घेताना प्रत्येकाच्या ओठांवर एकच भावना उमटत आहे –
“हीच खरी संस्कारांची श्रीमंती आणि आई–वडिलांच्या आशिर्वादांची ताकद आहे.”
