रस्त्यावर गवत टाकले या शिल्लक कारणावरून लठया काठ्यांनी जबर मारहाण किनगाव राजा पोलिसात परस्परांच्या विरोधात गुन्हा दाखल.

Screenshot_2025-09-10-15-29-12-44_3a637037d35f95c5dbcdcc75e697ce91

सिंदखेडराजा( अनिल दराडे )येथील भावकीच्या वादातून रस्त्यावर कांडी गवत का टाकले अशा शिल्लक कारणावरून दोन गटात लाठया काठ्यांनी तुंबळ हाणामारी दि 4 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी नऊ वाजेदरम्यान झाली दोन्ही गटाकडून परस्परांना बेदम हाणामारी करण्यात आल्याची घटना घडली दोन गटांच्या परस्पर तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले असून सदर आरोपींना अटक करीत आज दिनांक 9 सप्टेंबर रोजी सर्वांना एक दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे
याबाबत असे की, दुसर बीड येथील शेख रोशन शे. करमत यांनी पोलीस स्टेशन ला दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी शेख बाबू शेख गाणी शेख रफिक शेख गणी शेख नसीर शेख गणी शेख शेख फैजान शेख नसीर शेख राहील शेख बाबू व शेख अल्ताफ शेख बाबू यांनी हातामध्ये घेऊन रस्त्यावर कांडी गवत का टाकले असे म्हणून शेख इरफान शेख करामत यस बेदम मारहाण केली व शिवीगाळ करीत जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या अशी फिर्याद किनगाव राजा पोलीस स्टेशन ला दिली तर दुसऱ्या गटाकडून शेख रफिक शेख गणी यांनी दिलेले फिर्यादीवरून शेख इरफान शेख करमत यास रस्त्यावर गवत का टाकली अशी विचारणा केली असता शेख बाबू शेख गाणी याने चौकशी केली असता आरोपी शेख इरफान शेख करमत शेख लाल शेख मिया शेख रोशन शेख करामत शेख अल्ताफ शेख मेहता व शेख मुख्तार शेख जब्बार यांनी दुसर बीड शिवारांमधील त्यांच्या राहत्या घराजवळ शेख बाबू शेख गणी यांना हातामध्ये लाट्या काठ्या घेऊन मारहाण व शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली अशी फिर्याद दुसऱ्या गटाकडून देण्यात आली.यावरून किनगाव राजा पोलिसांनी दोन्ही गटाच्या आरोपीं विरूध्द विविध कलमा अंतर्गत गुन्हे दाखल करून दि 8 सप्टेंबर रोजी सर्व आरोपींना अटक केली आज दि 9 सप्टेंबर रोजी न्यायालय सिंदखेडराजा येथे आरोपीस हजर करण्यात आले असता न्यायालयाने सर्व आरोपींना एक दिवसाची पोलीस कुठली सुनावली आहे पुढील तपास ठाणेदार संजय मारतोंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली बीटजमादार श्री विष्णू मुंढे व शिवाजी बारगजे हे तपास करीत आहे

You may have missed

error: Content is protected !!