राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार पक्षाच्या अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्षपदी ऍड नाझेर काझी यांची निवड…

IMG-20250910-WA0052

सिंदखेडराजा (शहर प्रतिनिधी रवि ढवळे) सिंदखेडराजा नगरीचे माजी नगराध्यक्ष तथा बुलढाणा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष ऍड नाझेर काझी यांची तारीख 9 सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्षपदी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशाने महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुंबई येथे पत्र देऊन त्यांची निवड केली

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष एड नाझेर काझी हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष स्थापन झाल्यापासून सतत पक्ष सोबत एकनिष्ठ होते राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांची मोठी कारकीर्द आहे त्यांच्या कामाची पावती म्हणून व भविष्यात महाराष्ट्रात अल्पसंख्याक समाजाचा एक चांगला चेहरा राज्यातील संघटन वाढवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक च्या प्रदेशाध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली त्यांच्या निवडीमुळे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात त्यांचे निवडीचे स्वागत करण्यात येत आहे ऍड काझी यांना नियुक्तीपत्र देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे कृषिमंत्री दत्तामामा भरणे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील क्रीडा व अल्पसंख्याक मंत्री माणिकराव कोकाटे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ माजी मंत्री दिलीप वळसे पाटील माजी मंत्री नवाब मलिक आमदार इद्रिस नाईकवाडी आमदार मनोज कायंदे नजीबभाई मुल्ला यांच्यासह महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

You may have missed

error: Content is protected !!