नारायणराव नागरे महाविद्यालयात अंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धा (मुली) आयोजन.
सिंदखेडराजा (अनिल दराडे)
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती संलग्नित भगवान बाबा शिक्षण प्रसारक मंडळ रुम्हणा द्वारा संचलित नारायणराव नागरे महाविद्यालय दुसरबीड तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा येथे आयोजित आंतर महाविद्यालय विद्यापीठ स्तरीय कबड्डी स्पर्धा (मुली) यांचे आयोजन मा . डॉ . मिलिंद बारहाते (कुलगुरू संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती) यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आले . दिनांक 10 सप्टेंबर 2025 ते 13 सप्टेंबर 2025 या कालावधीत नारायणराव नागरे महाविद्यालय दुसरबीड येथे आंतर महाविद्यालयीन विद्यापीठ स्तरीय कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले . सिंदखेडराजा अनिल दराडे
दिनांक 10 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11:30 वाजता विद्यापीठ स्तरीय कबड्डी स्पर्धा (मुली) यांचा उद्घाटन कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. तोतारामजी कायदे साहेब (माजी आमदार तथा अध्यक्ष भगवान बाबा शिक्षण प्रसारक मंडळ रुम्हणा) हे होते . उद्घाटक म्हणून मा. प्रा. संजय खडसे साहेब उपविभागीय अधिकारी सिंदखेडराजा हे उपस्थित होते यांच्या हस्ते आंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धाचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. विजय नागरे सर अधिसभा तथा व्यवस्थापन परिषद सदस्य संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती तसेच प्राचार्य नारायणराव नागरे महाविद्यालय दुसरबीड यांनी केले . या कार्यक्रमासाठी मा .डॉ .खरात साहेब मा . शिवराज भाऊ कायंदे (सचिव भगवान बाबा शिक्षण प्रसारक मंडळ रूम्हणा) माननीय प्रभाकररावजी ताठे साहेब प्रा . जी .एस . देशमुख सर पत्रकार मा . बाजीरावजी वाघ साहेब पत्रकार संजयजी नागरे साहेब पत्रकार भोसले साहेब पत्रकार कोंढाणे साहेब प्राध्यापिका सौ धनश्री ताई कायंदे (संचालिका भगवानबाबा शिक्षण प्रसारक मंडळ रूम्हणा) प्राध्यापिका ठोके मॅडम प्रा. डाबरे सर प्रा . अभय सर प्रा . कोळी सर प्राध्यापिका रिंढे मॅडम प्राध्यापिका डामले मॅडम प्राध्यापिका डॉ . संगीता खडसे मॅडम प्रा . गवई सर यांचे प्रमुख उपस्थिती होती . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा . डॉ . दीपक देशमाने यांनी केले तसेच आंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धा – मुली या विद्यापीठ स्तरीय स्पर्धांचे आयोजन प्राचार्य डॉक्टर विजय नागरे सर यांनी केले .
कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य तोतारामजी कायंदे माजी आमदार तथा अध्यक्ष भगवान बाबा शिक्षण प्रसारक मंडळ रूमना यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. प्रा . संजयजी खडसे साहेब उपविभागीय अधिकारी सिंदखेडराजा यांनी आंतर महाविद्यालय विद्यापीठ स्तरीय स्पर्धाचे उद्घाटन केले व संघातील खेळाडूंना स्पर्धा खेळण्यासाठी शुभेच्छा दिल्या प्राचार्य डॉक्टर विजय नागरे सर अधिसभा सदस्य तथा व्यवस्थापन परिषद सदस्य संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती यांनी विद्यापीठ स्तरीय स्पर्धाच्या आयोजनाच्या मागचा उद्देश सांगितला तसेच सर्व संघांना खेळण्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर विजय नागरे यांनी करताना महिला गट स्पर्धा आयोजना मागची भूमिका विशद करून मागील तीन वर्षापासून महाविद्यालय यजमानपद स्वीकारत आहे एकवेळ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संधी मिळावी ही यामागचे भावना असून याबाबतीत रिपोर्ट करा महाविद्यालय सतत अग्रेसर राहील तर उद्घाटक म्हणून बोलताना प्राध्यापक संजय खडसे म्हणाले की जीवनामध्ये खेळाला अतिशय महत्त्व असून याद्वारे नियमित खेळ खेळल्याने आरोग्य तंदुरुस्त राहण्यास मदत होते त्याचबरोबर कबड्डी सारख्या खेळामधून विद्यार्थ्यांना सांघिक भावना निर्माण होते . खेळाडूंनी खेळाडू वृत्तीने या स्पर्धेकडे बघितले पाहिजे त्यासाठी अपयशाने हुरळून जाऊ नये तर हरलो तरी पुन् – प्रयत्न करावे . असा सल्ला उपस्थित खेळाडूंना देऊन उद्घाटन झाल्याचे जाहीर करून शुभेच्छा दिल्या .तर अध्यक्षीय समारोपय भाषणात मान्य तोतारामजी कायंदे साहेबांनी आज ही बदलत्या जीवनशैलीच्या काळातही कबड्डी सारख्या मार्गाने खेळ खेळाडूंना ताणतणाव यापासून मुक्ती देण्यात संविधान करण्यात त्याग व तणावहित जीवन कसे जगावे हे या खेळामध्ये सहभागी होऊन बक्षीस किंवा पारितोषिक साठी आनंद मिळवण्यासाठी खेळा जीवन छान असून आनंदाने जगण्यासाठी एक माऊस व आनंद घेण्यासाठी खेळून विशेष मुलींच्या स्पर्धा असल्याने एक प्रकारे महिलांना निर्भय बनून आपला व्यक्तिमत्व विकास घडवून आणावा असा आशावाद व्यक्त करून सर्वांना शुभेच्छा दिल्या .
