सात तासानंतर शेतकऱ्यांसह विनायक सरनाईक यांचे विमा कार्यालयातील आंदोलन स्थगीत..प्रशासनाकडून दखल;पिक विम्याच्या मुदयावर तक्रार निवारण समिती बैठक घेऊन शासनाला पाठवणार अहवाल…….
चिखली( निलेश कोल्हे)चिखली निसर्गाच्या लहरीपणापासून संरक्षण मिळावे म्हणून शेतकऱ्यांनी सन २०२४-२५साठी पीक विमा काढला होता त्यानुसार नुकसानभरपाई मिळणे अपेक्षित असते; मात्र चिखली तालुक्यातील काही शेतकऱ्यांना दि०९/०९/२०२५रोजी शेतकऱ्यांना केवळ १९, ६३,९९,२००,३०० अशी रक्कम जमा करून पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची क्रूर थट्टा केल्याचा प्रकार समोर आल्याने शेतकरी संघर्ष समितीचे विनायक सरनाईक,देविदास कणखर यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी आक्रमक पावित्रा घेत चिखली येथील विमा कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले होते.तालुका प्रशासनाच्या मध्यस्तीनंतर पिक विमा जिल्हा प्रतिनिधी यांनी आंदोलनातील मुद्द्यानूसार लेखी अश्वासन दिले आहे.त्याचप्रमाणे तहसिलदार यांनी या मागण्यांच्या अनुषंघाने शासन नियुक्त पिक विमा तक्रार निवारण समितीची बैठक दि१६सप्टेंबर रोजी घेवून समितीचा अहवाल शासनास पाठविण्यात येणार असल्याचे लेखी पत्र काढण्यात आल्याने आंदोलन स्थगीत करण्यात आले आहे.मात्र १०दिवसात मागण्यांची पुर्तता होवून पिक विमा न मिळाल्यास व तुटपुंजी उर्वरीत विमा रक्कम शेतकऱ्यांना न मिळाल्यास तिव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा नव्याने स्थापन झालेल्या संघर्ष समितीने दिला आहे.

शेतकऱ्यांच्या नुकसानीपोटी पीक विमा कंपन्यांकडून भरघोस मदत मिळणे अपेक्षित असताना चिखली तालुक्यात काही शेतकऱ्यांच्या खात्यावर केवळ १९, ६३, १४८, २९०, ३८६ रूपये इतकी तुटपुंजी रक्कम जमा करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे ज्या शेतकऱ्यांना अशी अत्यल्प रक्कम मिळाली आहे, त्याच गटातील दुसऱ्या शेतकऱ्यांना तब्बल लाखभर रूपयांची भरपाई मिळाली आहे. याचा फटका अनेक शेतकऱ्यांना बसला आहे. पीक विमा कंपनीकडून दिल्या जाणाऱ्या नुकसान भरपाईतील ही तफावत आणि भेदभावामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.विशेष म्हणजे यंदा अतिवृष्टीमुळे शेतकरी आधीच अडचणीत आले आहेत. त्यात गतवेळच्या नुकसानीपोटी अशा पद्धतीने शेतकऱ्यांना नागविण्याचा प्रकार सुरू असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.पीक विमा देताना झालेला अन्याय दूर करण्यासह त्यावेळी शेतात कृषी सहाय्यक व विमा प्रतिनिधी यांनी केलेल्या सर्व्हे फॉर्म(पंचनामा)प्रति उपलब्ध करून देण्यात याव्यात, तुटपुंजी विमा रक्कम प्राप्त शेतकऱ्यांना उर्वरीत रक्कम अदा करण्यात यावी,रक्कम मंजूर असून देखील तालुक्यातील रखडलेल्या अंदाजे २५००० शेतकऱ्यांची पिक विम्याची रक्कम अदा करण्यात यावी,पिक विमा देण्यास उशीर झाल्याने शासन आदेशानुसार व्याजासहित शेतकऱ्यांना विमा अदा करण्यात यावा,शेतकऱ्यांची हेळसांड थांबावी यासाठी तिन सहाय्यक प्रतिनीधी तालुक्यासाठी वाढविण्यात यावे,पैसे न दिल्याने नुकसान कमी दाखवलेल्या सर्वेसाठी नियुक्त कंपनी प्रतिनिधी व दोषींवर कारवाई करण्यात यावी,विमा मिळालेल्या व उर्वरीत शेतकऱ्यांची यादी प्रकाशीत करण्यात यावी, सन२०२३ची लॅड सिडींग त्रृटीतील शेतकऱ्यांची यादी प्रकाशीत करूण त्यांची पिक विमा रक्कम अदा करण्यात यावी,यासह विविध मागणीसाठी विनायक सरनाईक,देविदास कणखर,विलास वसू,विलास मुजमुले,प्रविण पाटील,अमोल पडघान,भरत जोगदंडे,यांच्यासह शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीचा ताबा घेत आक्रमक आंदोलन सुरू केले होते.जो पर्यंत मागण्यांची दखल घेतली जात नाही तोपर्यंत कार्यालय सोडणार नसल्याची भुमिका आंदोलनकर्ते व शेतकऱ्यांनी घेतली होती.आंदोलनाची तिव्रता बघता कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.दरम्याण तहसिलदार श्री काकडे,तालुका कृषी अधिकारी सुरडकर ठाणेदार संग्राम पाटिल,यांच्या मध्यस्तीनंतर विमा कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी यांना बोलवून घेवून शेतकऱ्यांच्या पिक विम्या संदर्भातील विविध मुद्द्यानवर सविस्तर चर्चा तालुका कृषी अधिकारी सुरडकर,कृषी विभागाचे लंबे व जिल्हा प्रतिनिधी श्री वाघ यांनी केल्याने व मागण्यांची पूर्तता करु व उर्वरीत पिक विमा रक्कम जमा करण्याचे अश्वासन दिल्याने त्याचप्रमाणे तालुका तक्रार निवारण समितीची दि१६सप्टेंबर रोजी आंदोलनातील मुद्यानंवर व शेतकऱ्यांच्या तक्रारीवर बैठक घेतली जाऊन याचा अहवाल जिल्हा समिती मार्फत शासनास पाठविण्यात येणार असल्याचे अश्वासन तालुका प्रशासनाने दिल्याने तब्बल ७तासानंतर आंदोलन स्थगीत करण्यात आले आहे.मागण्यांची पुर्तता न झाल्यास पुनःच्छा तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघर्ष समितीने दिला आहे.यावेळी विनायक सरनाईक,देविदास कणखर,विलास वसू,अमोल पडघान,प्रविण पाटिल,भरत जोगदंडे,बालासाहेब ठेंग,दिलीप वायाळ, रामेश्वर चके,मुरलीधर येवले,रवि टाले,विलास तायडे,रविद्र इंगळे,भागवत कदम,रविंद्र ठेंग,राजु कुटे,विजय पाटिल,बंडू शेळके, संदिप गवई,पवन शेगोकार,भाऊराव गवई, परमेश्वर शेळके, नितिन शेळके,विष्णु मोरे,आत्माराम मोरे,यांच्यासह असंख्य शेतकरी उपस्थित होते
व्यापक आंदोलनासाठी शेतकरी संघर्ष समिती स्थापन…
पिक विम्याच्या सतत समस्या निर्माण होत आहे.तर याबाबत नियमांचा खेळ खंडोबा झाल्याचे दिसून येत आहे.तर या कंपनीवर कसलही नियंत्रण नसल्यानेच शेतकऱ्यांना गंडवण्याचे काम होतांना दिसत आहे.यावर आंदोलनात चर्चा झाल्याने शेतकऱ्यांची सुद्धा यावर समिती होणे आवशक असल्याने व्यापक आंदोलन उभे रहावे यासाठी शेतकरी संघर्ष समिती स्थापन करण्यात आली आहे.
