असोला बु पिण्याच्या पाण्यापासुन वंचीत अंढेरा महावितरणच्या नियोजन शून्य कारभारा….
चिखली (एकनाथ माळेकर) चिखली तालुक्यातील मौजे असोला बु येथील ग्रामस्थ आठ दिवसापासून पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहे शासनाचा करोडो रुपये खर्च करून असोला बु पेयजल योजनेचे काम काही दिवसांपूर्वीच पूर्ण झाले आहे शासनाच्या धोरणानुसार प्रत्येक नागरिकाला 55 लिटर पाणी हे दररोज मिळाले पाहिजे परंतु असोला बुद्रुक येथील नागरिकांना ते मिळत नाही त्यामुळे असोला येथील नागरिकांमध्ये असंतोष आहे काही दिवसापासून पेयजल योजनेच्या टाकीतून असोला बु येथील गावाला पाणीपुरवठा होत होता त्यामध्ये सुद्धा अंढेरा महावितरणच्या कामचुकार हलगर्जीपणामुळे या गावावर पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहण्याची वेळ येत आहे जर लोकांना पाणी बदलले तर साथीचे रोग डोकं वर काढण्यास वेळ लागणार नाही असोला येथील ग्रामस्थांनी महावितरण चे प्रतिनिधी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आम्हाला उडवा उडवी चे उत्तर दिले आहे असे असोला बुद्रुक येथील श्रीकृष्ण कापसे व चंद्रशेखर चव्हाण यांनी बुलढाणा माझ्याशी बोलताना सांगितले आहे बुलढाणा माझाचे प्रतिनिधी यांनी अंढेरा महावितरणचे उपअभियंता यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की आठ दिवसापासून लाईन बंद नाही लाईन मध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे असोला बु येथील योजनेच्या विहिरीचा दोन दिवसापासून विज पुरवठा बंद आहे दुरुस्ती चे सामान आल्यानंतर ताबडतोब असोला बु येथील पेजल योजनेच्या विहिरीचा पुरवठा सुरळीत करून देण्यात येईल अशी माहिती दूरध्वनीवरून बोलताना उपाभियंता नागवे यांनी दिली आहे
