रूम्हना येथे पारधी वस्तीमध्ये हिवताप जनजागृती मोहीम
सिंदखेडराजा (अनिल दराडे )सिंदखेड राजा तालुक्यातील रूम्हना येथे नागरिका करिता, हिवताप जनजागरण मोहीम राबविण्यात आली, त्यामध्ये वस्ती मधील सर्व नागरिकांची रॅपिड टेस्ट द्वारे तपासणी करण्यात आली, त्यांना हिवताप, डेंगू, चिकनगुनिया, व हत्ती रोगाविषयी तसेच स्वच्छते विषयी मार्गदर्शन करण्यात आले, सदर मोहीम 11 सप्टेंबरला घेण्यात आली, यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रहेमान सय्यद, प्रयोगशाळा वैज्ञानिक विकास गवते, आरोग्य सहाय्यक संतोष खरात, चंद्र हास खरात, राजू घुगे, आरोग्य सेविका वैशाली गवई, आशा स्वयंसेविका लता जायभाये, यांनी परिश्रम घेतले, आरोग्य विभागाने पारधी वस्तीवर ही मोहीम राबवून, स्वच्छते विषयी व आरोग्य विषयी जनजागृती केल्यामुळे, समाजामध्ये जागरूकता निर्माण झाली, यावेळी पारधी समाजाचे सर्व महिला व पुरुष हजर होते,
रूम्हना येथे लसीकरण कॅम्प तसेच आरोग्याचे कॅम्प, व बालकांच्या लसीकरणासाठी, आरोग्य कर्मचाऱ्यांना स्वतंत्र बैठकी व्यवस्था, ग्रामपंचायत कार्यालयाकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे.
विनोद सातपुते
ग्रामपंचायत अधिकारी, रूम्हना
