मुंबई येथे महाराष्ट्र राज्य द पीपल ग्रुप फाउंडेशन ची स्थापना .
मुंबई (एकनाथ माळेकर) मुंबई येथे द पीपल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य च येऊन मुंबई येथे द पीपल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य ग्रुपची स्थापना केली असून या संस्थेच्या उद्घाटन सोहळ्यासोबत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम देखील दिमाखात चेंबूर येथे पार पडला.

संस्थेचे संस्थापक सदस्य चंद्रकांत सुभाष लहाने, मनोज हरिश्चंद्र हरनामे, फिरोज मुजावर, उमेश वाकोडे तसेच रोहित लोंढे यांनी आपल्या मित्रमंडळींसह हा उपक्रम सुरू केला आहे. समाजासाठी विविध उपक्रम राबविण्याचे उद्दिष्ट ठेवून फाउंडेशनची स्थापना करण्यात आली असून विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण, रुग्णसेवा, व्यसनमुक्ती अभियान, महिला जनजागृती, अपंगांना मदत आदी समाजोपयोगी उपक्रम संस्था राबवणार असल्याची माहिती चंद्रकांत लहाने यांनी दिली.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून युवा सरपंच भरत जोगदंडे व मधुकर कांबळे उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांचा सन्मानपत्र व पेन देऊन गौरव करण्यात आला. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन समाजोपयोगी उपक्रम राबविणाऱ्या संस्थेचा हा उपक्रम अनुकरणीय असल्याचे मत भरत जोगदंडे यांनी व्यक्त केले. तर संस्थेचे कार्य पुढेही यशस्वीपणे सुरू राहावे, अशा शुभेच्छा मधुकर कांबळे यांनी दिल्या.
संस्थेच्या अध्यक्षा अॅड. आश्लेषा जाधव यांनी गेल्या एका वर्षातील उपक्रमांचा आढावा घेतला तसेच पुढील काळात संस्था विविध समाजोपयोगी कार्य कशा प्रकारे करणार याबाबत माहिती दिली.
या प्रसंगी शंकर बोर्डे, पूजा मोरे, दिपाली जुकनामे, तेजस धुमाळे, अनिकेत चांदोडे, अक्षय सोनवणे, जसवंत बहादुरे, वर्षा मोरे, विनोद अडकमोल, आदित्य सिंग आदी मान्यवरांसह संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पूजा मोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन मनोज हरिश्चंद्र हरनामे यांनी मानले.
