हत्ता येथील प्रकरणामधील मुख्य आरोपीला बेड्या ठोकून पोलिसांनी घेतले ताब्यात…
लोणार (यासीन शेख)सविस्तर वृत्त असे आहे की
लोणार तालुक्यातील हत्ता गावामध्ये १०
जून २०२५ रोजी रात्री ठिक ८:००ते ८:३० च्या दरम्यान तुफान वाद झाला होता. एका पत्रकारासह त्यांच्या पत्नीवर अमानुष हल्ला करण्यात आला होता. या घटनेने संपूर्ण गावात खळबळ उडाली होती.पीडित कुटूंबांनी जवळच्या लोणार पोलीस स्टेशनं मध्ये तक्रार दाखल केली होती. तर पोलिसांनी सदर आरोपी (1)शरद रामभाऊ पवार, (2)विकास किसन पवार,
(3) दिलीप गोविंद पवार ,
(4) संदीप गोविंद पवार,
(5) विजय किसन पवार
(6) गोविंद हरी पवार यांच्या वर लोणार पोलीस ठाण्यात संबंधित ६ जणांविरोधात भा.दं.वि. कलम १८९(२), १९०, १९१(२), १९१(३), ११८(१), ११८(२). ११५ (२), ३२६, ३५१(२) व ३५२अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरच्या गुन्ह्यांचा तपास अधिकारी बिट जमादार श्री सुधाकर गवाई ,यांच्या मार्गदर्शनांखाली सुरु होता. आरोपीनी वकील च्या मदतीने जिल्हा सत्र न्यायालय मेहकर येथे जमीन मिळण्यासाठी जमीन अर्ज सादर केला असता जिल्हा सत्र न्यायालय नी दोन वेळा जमीन फेटाळला. नंत्तर आरोपी यांनी पुन्हा आपल्या वकील च्या मदतीने उच्च न्यायालय खंडपिठ नागपूर येथे सुद्धा जमीन अर्ज दाखल केला होता तर उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर यांनी सुद्धा जमीन फेटाळला असून अखेर आज आरोपी ची माहिती मिळताच लोणार पो.स्टेशनं यांनी मुख्य आरोपी (२) विकास किसन पवार याला ताब्यात घेतले. तीन महिन्यापासून फरार असलेला आरोपी अखेर लोणार पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपीला ताब्यात घेऊन आरोपीला बेड्या ठोकल्या आहे. सदर आरोपी ला दिवाणी न्यायालय लोणार समोर हजर केलें असता दिवाणी न्यायालय लोणार यांनी ४ दिवसाची पोलीस कोठडी दिली असून आरोपी ला बुलढाणा येथील कारागृह येथे नेण्यास सांगण्यात आले आहे. सदर चा तपास हा लोणार पोलीस स्टेशनं चे (पी.आय) मेहत्रे साहेब. बिट जमादार श्री सुधाकर गवाई , पो. गजानन दराडे , पो. प्रदीप पवार , पो. सरकटे,यांच्या दमदार कामगिरी च्या माद्यमातून आज पीडित कुटुंबांला न्याय मिळालं असे चित्र दिसत आहे.
