सेवापंधरवाडा या योजनेच सर्वसामान्य जनतेने लाभ घ्यावा . तहसीलदार संतोष काकडे

IMG-20250916-WA0000


चिखली एकनाथ माळेकर महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग, शासन निर्णय क्रमांक/मराअ -2025/प्र.क्र.63(ई ऑफीस क्र.1296378)/समन्वय-I दिनांक 01 सप्टेंबर 2025 अन्वये शासनाने महसूल विभागामार्फत राज्यात दिनांक 17 सप्टेंबर 2025 ते 02 आक्टोंबर 2025 खालील तीन टप्प्यात सेवा पंधरवडा राबविण्यात येत आहे.
टप्पा -1 पाणंद रस्ते मोहीम (17 सप्टेंबर 2025 ते 22 सप्टेंबर 2025)- चिखली तालुक्यामध्ये शेतस्ता/शिवार रस्ता पाणंद रस्ते खुला करणेबाबत कालबध्द कार्यक्रम राबविण्यात आलेला आहे. सदर सर्व ग्रामिण भागातील ग्रामिण रस्ते, हद्दीचे ग्रामीण रस्ते, प्रामीण गाडीमार्ग, पायमार्ग शेतावर जाण्याचे पायमार्ग गाडीमार्ग या रस्त्यांचे सिमांकन करणे व त्यांना विशिष्ट क्रमांक देणेबाबत शासन निर्णय महसूल व वन विभाग दि. 29 ऑगस्ट, 2025 अन्वये निर्देश देण्यात आलेले आहेत.

टप्पा -2 सर्वांसाठी घरे उपक्रम (23 सप्टेंबर 2025 ते 27 सप्टेंबर 2025)-
सर्वांसाठी घरे ‘सर्वांसाठी परे’ या उपक्रमासाठी पुरक उपक्रम दिनांक 23 सप्टेंबर 2025 ते दि 27 सप्टेंबर 2025 या कालावधीत राबविणेबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत. “सर्वासाठी घरे” या उपक्रमातंर्गत शासनाकडून निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार अंमलबजावणी करणेबाबत निर्देशीत करण्यात आलेले आहे. त्याअनुषंगाने ग्रामविकास विभागाचे दिनांक 16 फेब्रुवारी 2018 व नगर विकास विभाग दि. 17 नोव्हेंबर 2018 रोजीचे शासन निर्णयानुसार ग्रामीण भाग व शहरी भागातील शासकीय जमिनीवरील निवासी प्रयोकनासाठी केलेली अतिक्रमणे नियमानुकूल करण्याच्या धोरणात सुधारणा करण्यात आलेल्या असुन सदर धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी पंचायत समिती स्तरावर उपविभागीय अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली शक्ती प्रदत्त समिती गठीत करण्यास मंजूरी देण्यात आलेली आहे. शासन निर्णयामध्ये दिलेल्या निर्देशानुसार “सेवा पंधरवाडा” अंतर्गत ‘सर्वांसाठी घरे’ उपक्रम यशस्वीरित्या राबविणेसाठी सदर शासन निर्णयामध्ये नमुद कार्यपदधतीनुसार व यानुषंगाने शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय व प्रचलित धोरणांनुसार कार्यवाही करण्यात येणार असून तसेच भुमिहिन गरजु व बेघर कुटुंबांना घरकुलासाठी जागा नियमानुकुल करण्यासाठीचे परिपूर्ण प्रस्ताव हे शक्ती प्रदत्त समीतीकडे उचित कार्यवाहीस्तव पाठविण्यात येणार आहेत , जेणेकरुन भुमिहीन मंजुर घरकुल लाभार्थी जागेअभावी घरकुलाच्या लाभापासून वंचित राहणार नाही.
टप्पा -3 नाविन्यपूर्ण उपक्रम ( 28 सप्टेंबर 2025 ते 02 आक्टोंबर 2025)-
आदिसेतू /जन संवाद विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत राबविण्यात आलेल्या आदिसेतू उपक्रमाच्या धरतीवर आपल्या तालुक्यात दि. 30.09.2025 रोजी आदिसेतू उपक्रम राबविण्यात येणार आहे.
जिवंत सातबारा मोहिम टप्पा 1 व 2 अंतर्गत कार्यवाही जिवंत सातबारा मोहिम टप्पा 1 व 2 अंतर्गत सर्व प्राप्त प्रकरणे मोहीम स्वरुपात निकाली काढण्यात येणार आहे.
लोक अदालत आयोजन करणे: प्राप्त अर्थ न्यायिक प्रकरणांची मंडळ स्तरावर चौकशी करणे, स्थळ पहाणी करून अहवाल अंतिम करणे व प्रकरणे सामंजस्याने निकाली काढणे, प्रकरणात अंतिम आदेशाची अंमलबजवाणी करणे, प्रकरण अंतिम आदेशाकरीता बंद असल्यास प्रकरणात अंतिम आदेश पारीत करणे, मामलेदार न्यायालय अधिनियम 1906 अंतर्गत प्रकरणे तातडीने निकाली काढण्याच्या अनुषंगाने दि. 23.09.2025 रोजी मंडळ अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय स्तरावर लोक अदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे.
धरती आबा योजने अंतर्गत अंतर्भूत गावांमध्ये आदी कर्मयोगी अभियान राबविण्यात येणार आहे.महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी मंडळस्तरावर “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरांचे आयोजन करण्याचे निर्देशित केलेले असल्याने चिखली तालुक्यात दिनांक 19/09/2025 रोजी 1) चिखली 2) उदयनगर 3) केळवद 4) पेठ व 5) एकलारा तर दिनांक 26/09/2025 1) अमडापुर 2) धोडप 3) चांधई 4) शेळगांव आटोळ 5) कोलारा व 6) मेरा खु. या महसूल मंडळामध्ये “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर” आयोजित करण्याचे निश्चित केलेले आहे.

      सेवा पंधरवडा राबविण्याबाबत आज दि.15/09/2025 रोजी आढावा सभा तहसील कार्यालय चिखली येथे घेण्यात आली. करीता चिखली तालुक्यातील जनतेने “दिनांक 17 सप्टेंबर 2025 ते 02  आक्टोंबर 2025” या कालावधीमध्ये राबविण्यात येत असलेल्या सेवा पंधरवडा मध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून आपली प्रलंबित कामे पुर्ण करुन घ्यावी असे आवाहन श्री.संतोष काकडे, तहसिलदार चिखली यांच्याकडून करण्यांत येत आहे. 

You may have missed

error: Content is protected !!