शासन निर्णय झाला मानधन कधी रोजगार सेवकाचा प्रश्न ऐरणीवर
चिखली (एकनाथ माळेकर) चिखली तालुक्यातील रोजगार सेवकाचे
03 ऑक्टोबर 2024 रोजीच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करणे साठी. तसेच सप्टेंबर 2024 ते आजपर्यंत ग्रामरोजगार सहाय्यकांच्या मानधन मिळाले नाही
दि. 03 ऑक्टोबर2024 रोजीचा महाराष्ट्र शासनाचा शासन निर्णय क्र. मग्रारो-2024/प्र.क्र. 63/शासन निर्णयाला 10 महिने उलटून सुद्धा अद्यापर्यंत त्याची शासन दरबारी अंमलबजावणी झालेली नाही. सदर शासन निर्णयानुसार ( 8000 रु. दरमहा व 2000 रु. इन्सेटीव व डेटा पॅक करीता एकूण 10,000/- रु) दरमहा मानधन नियोजित आहे. त्यामुळे माहे सप्टेंबर 2024 ते अद्यापपर्यंत कोणत्याही जी.आर ची अंमलबजावणी करण्यात आली नाही तसेच टक्केवारी नुसार देय असलेले मानधन बुलढाणा जिल्ह्यामध्ये सप्टेंबर 2024 पासून ते आजपर्यंत वितरीत करण्यात आलेले नाही.
परीणामी, बुलढाणा जिल्ह्यातील सर्वच ग्राम रोजगार सहाय्यकांना मानसिक तसेच आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. एम. आर.ई.जी.एस अंतर्गत ग्रामपंचायत व पंचायत समिती यांना जोडणारा महत्वाचा दुवा म्हणून ग्राम रोजगार सहाय्यकांना ओळखले जाते. असे असून सुद्धा सदर पदावर काम करणाऱ्या रोजगार सहाय्यक शासन व प्रशासनाने सर्वस्वी दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
तरी महोदय, दि. 17 सप्टेंबर 2025 रोजी पर्यंत शासन दरबारी, संदर्भीय विषयाची अंमलबजावणी तसेच थकीत असलेले मानधन ग्राम रोजगार सहाय्यकांना वितरीत न झाल्यास, आम्ही दि. 18 सप्टेंबर 2025 रोजी पासून संपुर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येईल, याची नोंद घ्यावी व होणाऱ्या परिणामास आपण व आपले प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील. असे निवेदन चिखली गटविकास अधिकारी यांना देण्यात आले आहे
