तारखेवर गैरहजर राहणाऱ्या आरोपींना थेट बुलढाणा कारागृहात रवानगी……
बुलढाणा (बुलढाणा माझा न्युज) न्यायालयात मध्ये आरोपी गेरहजर राहण्याचा आरोपींना फटका बसला असून अखेर त्यांचा मुक्काम थेट बुलढाणा जिल्हा कारागृहात ठरला आहे. अमडापूर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार सपोनि निखिल निर्मळ यांच्या मार्गदर्शनाखाली न्यायालयाकडून प्राप्त एन. बी. डब्ल्यू वॉरंटमधील फरार आरोपींना पकडण्यासाठी विशेष पथक स्थापन करण्यात आले.पोलीस हेडकॉन्स्टेबल शिवाजी सुरडकर यांच्या नेतृत्वाखाली नापोकॉ गजानन काकडे, पो. कॉ. धर्मराज पवार, रणजित सरोडे व मपोकॉ वैशाली आराख यांनी १५ सप्टेंबर रोजी जोरदार शोधमोहीम राबवली. या कारवाईत अनेक गुन्ह्यातील फरार आरोपींना अटक करण्यात यश आले. अटक केलेल्या आरोपींमध्ये केस क्र. ९६/२०१२ कलम ३२४, ३२३, ५०४, ३४ भादंवि मधील योगेश दशरथ लहाने (३५), दशरथ कचरू लहाने (६२), भास्कर हरिभाऊ लहाने (३६), रा. दहिगाव, केस क्र. ३५१/२०१७ कलम १४३, १४७, १४८, ३२४, ५०४, ५०६ भादंवि मधील धनराज मोहनसिंग मोहिते (३५), रा. हरणी, केस क्र. ९७/२०१२ कलम ३२४, ५०४, ५०६ भादंवि मधील दामोधर साहेबराव तायडे (३५), रा. पेठ, केसक्र. ३४४/२०१६ कलम ३७९ भादंवि मधील पंकज दगडू सोळंके, रा. घानमोडी, ता. चिखली, सदर आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर योगेश लहाने, दशरथ लहाने, भास्कर लहाने,दामोधर तायडे व पंकज सोळंके यांना थेट बुलढाणा जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली. या धडक कारवाईमुळे स्थानिक परिसरात मोठी खळबळ उडाली असून गुन्हेगारांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
न्यायालयीन तारखेवर गैरहजर राहिल्यास कठोर कारवाई टाळता येणार नाही, असा स्पष्ट इशारा ठाणेदार निखिल निर्मळ यांनी दिला आहे.
