छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवड्याची सुरुवात

IMG-20250917-WA0047


सिंदखेडराजा(अनिल दराडे) सिंदखेड राजा (दि. १७ सप्टेंबर २०२५) : तहसील कार्यालय सिंदखेड राजा व ग्रामपंचायत रूम्हणा यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवडा १७ सप्टेंबर (पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन) ते २ ऑक्टोबर (महात्मा गांधी जयंती) या कालावधीत राबविण्यात येत आहे.

हा पंधरवडा तीन टप्प्यात पार पडणार आहे.

पहिला टप्पा (१७ ते २२ सप्टेंबर) : पाणंद रस्ते विषयक मोहीम, रस्ता सर्वेक्षण, मोजणी, सीमांकन व अतिक्रमणमुक्ती.

दुसरा टप्पा (२३ ते २७ सप्टेंबर) : सर्वांसाठी घरे – शासकीय जमिनीवर कब्जेहक्क, अतिक्रमणे नियमानुकूल करणे व पट्टे वाटप.

तिसरा टप्पा (२८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर) : नाविन्यपूर्ण उपक्रम – जिवंत ७/१२ अद्ययावत करणे, जनसंवाद शिबिरे, महसूली लोक अदालती, घरटी आवा अभियान, तसेच विमुक्त व भटक्या जमाती लाभार्थ्यांना ओळखपत्रे व योजनांचा लाभ.

या सेवा पंधरवड्यामुळे शेतकरी, नागरिक व वंचित घटकांना थेट लाभ होणार असल्याचे तहसील प्रशासनाने सांगितले.

You may have missed

error: Content is protected !!